शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी, जीएसटीचा सर्कशीवर घाव!; अडीच वर्षांत आठ सर्कस कंपन्यांना लागले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 11:58 IST

झोक्यांवरील तसेच हवेतील कसरती, मृत्यूगोल, पोट धरून हसवणारा विदूषक, ताकदीची चित्तथरारक प्रात्यक्षिके, चलाख कुत्री, काकाकुवा यांचे प्रयोग अशा विविध प्रकारांतून लोकांची करमणूक करणाऱ्या सर्कशींना आता घरघर लागली आहे.

ठळक मुद्देसरकारच्या धोरणांमुळे सर्कशी बंद पडण्याच्या मार्गावर : उमेश आगाशे सर्कशीला राजाश्रयही मिळत नसल्याने या कलेचे पुनरुज्जीवन अवघड

प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : झोक्यांवरील तसेच हवेतील कसरती, मृत्यूगोल, पोट धरून हसवणारा विदूषक, ताकदीची चित्तथरारक प्रात्यक्षिके, चलाख कुत्री, काकाकुवा यांचे प्रयोग अशा विविध प्रकारांतून लोकांची करमणूक करणाऱ्या सर्कशींना आता घरघर लागली आहे. सर्कसमध्ये प्राणी वापरण्यास बंदी करण्यात आल्याने मृत्युपंथाला लागलेल्या सर्कशीवर नोटबंदी, जीएसटीने अखेरचा घाव घातला आहे. आर्थिक अडचणींवर गेल्या अडीच वर्षांत तब्बल आठ सर्कस कंपन्या बंद पडल्या आहेत.भारतातील सर्कशींना तब्बल १४० वर्षांचा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातही सर्कशींनी सामान्यांसाठी करमणुकीचा पर्याय उभा केला. भारतीय सर्कसच्या इतिहासाची मुहूर्तमेढ विष्णुपंत छत्रे या मराठी माणसाने महाराष्ट्रात रोवली. त्यानंतर अनेक सर्कस कंपन्या महाराष्ट्रात पाय रोवून उभ्या राहिल्या. स्वातंत्र्यलढ्यात सर्कशींनी अनेक क्रांतिकारकांना आसरा दिला. युद्धामध्ये आपापल्या परीने सर्कशींनी मदतीचा हात दिला. मात्र, सर्कशींचे हे योगदान राजकारण्यांना, सध्याच्या पिढीतील लोकांना माहीत नाही. सरकारची धोरणे, क्लिष्ट नियम, प्राणिप्रेमी संघटनांना आक्षेप यामुळे गेल्या काही वर्षांत सर्कशींना घरघर लागली आहे. ‘प्राणिप्रेमी संघटनांनी आमच्याकडून जनावरे काढून घेतली. सरकारला कायदा करण्यास भाग पाडले. मात्र, जनावरांच्या नावाखाली या संघटना परदेशातील संस्थांकडून कोट्यवधींचा निधी बळकावत आहेत. वेल्फेअर बोर्डाने क्लिष्ट नियम तयार केले. इतर देशांतील सर्कशींच्या नियमांवर बोट ठेवले. मात्र, इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातील परिस्थितीचे निकष विचारात घेतले जात नाहीत. बालमजुरांना सर्कशीमध्ये काम करण्यास बंदी घालण्यात आली. मात्र, बेरोजगारीमुळे अनेक मुले वाईट मार्गाला लागत आहेत. घरी अठरा विश्वे दारिद्र्य असल्याने आणि कमाईचे साधन बंद झाल्याने उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले आहे. सरकारच्या धोरणांमुळे सर्कशी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत’, अशी व्यथा सर्कशीचे व्यवस्थापक उमेश आगाशे यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.‘आजच्या पिढीतील मुलांसमोर करमणुकीची अनेक साधने उपलब्ध आहेत. मोबाईल, टीव्हीचे वेड, मॉलसंस्कृती यामुळे मुलांना सर्कशीतील खेळांचे अप्रूप वाटेनासे झाले आहे. मुलांमधील संयम कमी झाल्याने अनेकदा सर्कस सुरू झाल्यावर काही वेळातच मुले कंटाळतात. त्यांना मोबाईलमध्ये रमायला आवडते’, अशी खंत व्यक्त करतानाच सर्कशीतील खेळ पाहून आजवर कोणताही गुन्हा घडल्याचे ऐकिवात नाही, असेही आगाशे म्हणाले.

चाळीस हजार ते एक लाख दिवसाचा खर्चसर्कसचा एका दिवसाचा खर्च ४० हजार ते दीड लाख रुपये असतो. यामध्ये जागेचे भाडे, वीजबिल, कर्मचाऱ्यांचा पगार, साहित्याचा खर्च आदी वगळता फारच कमी उत्पन्न हातात मिळते. सर्कसमध्ये जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कलाकारांना सरकार कोणतेही प्रोत्साहनपर पुरस्कार देत नाही. सर्कशीला राजाश्रयही मिळत नसल्याने या कलेचे पुनरुज्जीवन कसे होणार, हा प्रश्न कंपनीच्या व्यवस्थापकांना सतावत आहे. 

जीएसटीचाही फटकासर्कशीच्या खेळांना जीएसटीचाही फटका बसला आहे. पूर्वी सर्कशीची तिकिटे ३०० रुपयांपेक्षा जास्त असायची. जीएसटीमुळे खेळांवर परिणाम होऊ नये, यासाठी तिकिटे १००, २०० आणि २४९ रुपये अशी करण्यात आली आहेत. 

टॅग्स :PuneपुणेGSTजीएसटीNote Banनोटाबंदी