भोर शहरातील चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भोर नगरपालिकेच्या वतीने सुमारे २० लाख रु. खर्चून अत्याधुनिक पध्दतीने सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष निर्मला आवारे.
मुख्यधिकारी विजयकुमार थोरात, काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, कृष्णा शिनगारे, नगरसेवक अनिल पवार, सुमंत शेटे, सचिन हर्णसकर, गणेश पवार,अमित सागळे,चंद्रकांत मळेकर समिर सागळे,सादिक फरास,तृप्ती किरवे,आशा रोमण अमृता बाहिरट आशा शिंदे,वृषाली घोरपडे,स्नेहा पवार,सोनम मोहिते, रुपाली कांबळे, तानाजी तारु, देवीदास गायकवाड उपस्थित होते.
संग्राम थोपटे म्हणाले, भोर शहरात नगरपलिकेच्या माध्यमातून कोट्यवधींची विकासकामे झाली असून, भविष्यातही होतील मात्र काही जण कारण नसताना राजकारण करुन टीका करत आहे. काम चांगले झाले की टीका होते. त्यामुळे आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. छत्रपतीचे नाव घेऊन आम्ही राजकारण करत नाही, तर छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन त्यांचा आर्दश डोळ्यांसमोर ठेवून काम करतो, असा टोला थोपटे यांनी लगावला. १९९९ साली माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी सदरचा पुतळा उभारला असून, त्या वेळी काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष खासदार सोनिया गांधी यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन झाले होते. मात्र मागील २० वर्षे झाल्याने पुतळा परिसराची दुरुस्ती व सुशोभीकरण करणे गरजेचे होते. त्यामुळे आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली भोर नगरपलिकेच्या वतीने पुतळ्याच्या बाजूने दगडी बांधकाम असलेली संरक्षक भिंत आकर्षक विद्युत रोषणाई, गार्डन,लाॅन महाराजांच्या पुतळ्यास हार घालायला हायड्रोलिक शिडी इत्यादी कामाचा समावेश आहे.सदरचे काम युध्दपातळीवर काम पूर्ण करुन आज उद्घाटन करण्यात आले.
भोर शहरातील चौपाटी येथील शिवाजीमहाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण उद्घाटन करताना आमदार संग्राम थोपटे.