शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘उत्कृष्ट संसदपटू नव्हे, तर सेल्फीपटू’, विजय शिवतारेंची खासदार सुळे यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 00:58 IST

आपण ‘उत्कृष्ट संसदपटूऐवजी उत्कृष्ट सेल्फीपटू नक्कीच व्हाल’ अशी टीका जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहून केली आहे.

जेजुरी : आपण ‘उत्कृष्ट संसदपटूऐवजी उत्कृष्ट सेल्फीपटू नक्कीच व्हाल’ अशी टीका जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहून केली आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, याबाबत सुप्रिया सुळेंना विचारले असता असे कुठलेही पत्र मिळाले नसल्याचे सांगत असे पत्र आल्यास त्याला योग्य उत्तर देणार असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र, या पत्रामुळे तालुक्यातील राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे.पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकांपूर्वी वातावरणनिर्मिती करण्यास सर्वच राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. यात सर्वांत स्वस्त आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे राजकीय पक्ष समाजमाध्यमांचा वापरही करू लागले आहेत. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून लिहिलेल्या टीकात्मक पत्रात सुळे यांनी केलेल्या आंदोलनांची टर उडविण्यात आली आहे.राज्यमंत्री शिवतारे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात सेल्फी आंदोलनाबाबत टीका करत आपण ‘उत्कृष्ट संसदपटूऐवजी उत्कृष्ट सेल्फीपटू नक्कीच व्हाल’ असे म्हटले आहे. मी स्वत: धावपळ करून या मतदारसंघात विविध विकासकामे मंजूर करून आणतो. काम मंजूर झाल्याची माहिती सुप्रिया सुळे अधिकाऱ्यांकडून घेतात. काम सुरू होण्यापूर्वी त्या तेथे जाऊन सेल्फी काढून एखादे आंदोलन करतात आणि आपल्या आंदोलनामुळेच हे काम होत असल्याचा समज जनतेत निर्माण करून देतात. त्यांचे हे तंत्र आपल्या लक्षात आले असून, आपण खासदार म्हणून कोणती कामे केली त्यांची सेल्फीच्या माध्यमातून समाजाला माहिती द्यावी. त्यासाठी ‘सेल्फी विथ सुप्रिया सुळेज वर्क्स’ अशी एखादी मोहीम राबवावी, असे उपहासात्मक आवाहनही केले आहे. सेल्फीच्या माध्यमातून आंदोलने, आरोग्य शिबिरे, जिल्हा परिषदेच्या सायकली वाटायला खासदार होण्याची गरज नाही. अशी कामे तर कोपºयावरील गणेश मंडळांचे अध्यक्षही करतात, अशी टीका करताना त्यांनी खासदार म्हणून आपण आपल्या मतदारसंघात कोणती कामे केली ती लोकांसमोर ठेवण्याचे आवाहन शिवतारे यांनी या खुल्या पत्रातून केले आहे. हे पत्र सध्या व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र फिरत आहे.>या पत्राबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र हे खुले पत्र अजून तरी आपल्याला मिळालेले नाही. सोशल मीडियातील पत्रावर कोण विश्वास ठेवणार? प्रत्यक्ष पत्र मिळाल्यावर मला जे उत्तर द्यायचे ते मी जरूर देईन, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे