शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची घरातच 'नॉर्मल' प्रसूती

By admin | Updated: January 30, 2016 03:58 IST

'सिझेरियन'ला पर्याय नाही असे सांगत डॉक्टरांनी एका गरीब बाळंतिणीला असहाय केले. शस्त्रक्रियेचा खर्च परवडणारा नसल्याने ती बिचारी पतीसमवेत घरी निघून आली. बाळाला जन्म

शिरूर : 'सिझेरियन'ला पर्याय नाही असे सांगत डॉक्टरांनी एका गरीब बाळंतिणीला असहाय केले. शस्त्रक्रियेचा खर्च परवडणारा नसल्याने ती बिचारी पतीसमवेत घरी निघून आली. बाळाला जन्म द्यायचा कसा, या विवंचनेत पती पत्नी असताना 'देव तारी...' या उक्तीला या शोभावे या प्रमाणे तिची घरातच नॉर्मल प्रसूती झाली. झपाट्याने वाढत्या व्यावसायिकता अंगीकारणाऱ्या वैद्यकीय पेशालाही विचार करायला लावावी अशी ही घटना प्रत्यक्षात घडली. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या बाळासाहेब लोणारे हे तीन दिवसांपूर्वी पत्नीची प्रसूती करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात गेले. प्रसूतीसाठीचा कालावधी पूर्ण झालेला होता. ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याने तिची इतर डॉक्टरने व्यवस्थित तपासणी न करता शस्त्रक्रिया करावी लागेल, तुम्ही ससूनला जा, असा सल्ला दिला. या दाम्पत्याने खासगी डॉक्टरांचाही दरवाजा ठोठावला. तिथेही शस्त्रक्रियाच करावी लागेल, असे सांगितले. खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेचा खर्च गरिबांना परवडणारा नाही. ससूनला जाणे शक्य नाही अशा असहाय अवस्थेत ती महिला पतीसह घरी आली. त्याचदिवशी संध्याकाळी ही महिला घरातच प्रसूत झाली. विशेष म्हणजे, बाळ-बाळंतिणीची प्रकृती ठिक आहे. सर्वसामान्य गरीब घटकांसाठी शासनाने ग्रामीण रुग्णालये सुरू केली. मात्र, रुग्णालयांच्या इमारतीच उभारल्या. सुविधांपासून रुग्ण वंचित राहत आहेत. ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यास काय हरकत आहे. तेथे शस्त्रक्रिया केल्यास गरीब महिला रुग्णांना आधार मिळू शकेल.अनुत्तरीत काही प्रश्नशस्त्रक्रिया करण्याएवढी तिची परिस्थिती गंभीर होती, तर तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल का करण्यात आले नाही, खासगी डॉक्टरांनीही व्यवसाय न पाहता सेवा या दृष्टिकोनातून तिची साधारण प्रसूती का नाही केली, असे प्रश्न यातून निर्माण झाले आहेत.