शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

नोटाबंदीचे बाजारावर सावट

By admin | Updated: November 14, 2016 02:32 IST

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याचे भाव स्थिर राहिले असून, बटाट्याचे भाव निम्म्याने घटले आहेत.

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याचे भाव स्थिर राहिले असून, बटाट्याचे भाव निम्म्याने घटले आहेत. बाजारात कांद्याची आवक ५५० क्विंटल होऊन प्रतिक्विंटल ११०० रुपये भाव मिळाला. मागील आठवड्यात कांद्याला ११०० रुपये भाव होता. मागील आठवड्यात कांद्याचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; पण ते स्थिरच राहिले. शिवाय बटाटा निम्म्याने घटल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. त्यातच आणखी भर म्हणजे नोटा बदलांमुळे बाजारात मंदीचे सावट दिसून आले. वाटाणा, वांगी, भेंडी, दोडका, गवार, शेवगा या भाज्यांचे भाव तेजीत राहिले. हिरव्या मिरचीचे भाव स्थिर राहून मिरचीला ८० ते १०० रुपये प्रतिदहा किलोस भाव मिळाला.शेतमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा - एकूण आवक - ५५० क्विंटल. भाव क्रमांक १ - ११०० रुपये, भाव क्रमांक २ - ८०० रुपये, भाव क्रमांक ३ - ७०० रुपये. बटाटा - एकूण आवक ७०० क्विंटल. भाव क्रमांक १ - ११०० रुपये, भाव क्रमांक २ - ८०० रुपये, भाव क्रमांक ३ - ६०० रुपये. भुईमूग शेंग (जळगाव) व भुईमूग शेंगची (बंदूक) आवक बाजारात झाली नाही.लसूण - एकूण आवक ४ क्विंटल. भाव क्रमांक १ - १२०० रुपये, भाव क्रमांक २ - ११०० रुपये, भाव क्रमांक ३ - ९०० रुपये.फळभाज्या : चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती १० किलोंसाठी डागांना मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे : हिरवी मिरची- २५५ पोती ( ८० ते १०० ) टोमॅटो - ४०० पेट्या ( ७० ते १२० रुपये ), कोबी - १९० पोती (३० ते ५० रुपये), फ्लॉवर -२२० पोती ( ८० ते १२० रुपये ), वांगी - २५० पोती ( १५० ते २५० रुपये), भेंडी- १८० पोती (२०० ते २५० रुपये), दोडका - ४५ पोती ( २०० ते ३०० रुपये ), कारली -२२५ डाग ( १०० ते १५० रुपये), दुधीभोपळा -१७० पोती ( ५० ते १०० रुपये), काकडी - १२५ पोती (८० ते १०० रुपये), फरशी -८९ पोती (१५० ते २०० रुपये), वालवर - ४९ डाग ( २५० ते ३००), गवार - ९५ डाग (३०० ते ४०० रुपये), ढोबळी - २३२ डाग (१०० ते २०० रुपये ), चवळी -१२० डाग (१०० ते २०० रुपये), वाटाणा - ३८ पोती (५०० ते ६०० रुपये) शेवगा - ४० डाग (४०० ते ५०० रुपये).