शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

नसल्या नोटा; तरीही मद्याला नाही तोटा

By admin | Updated: November 17, 2016 03:43 IST

कोणत्याही परिस्थितीत व्यसनपूर्ती केलीच जात असल्याने सुरुवातीचे दोन दिवस वगळता देशी, विदेशी मद्यांच्या दुकानांमध्ये किंवा बिअरबारमध्ये नेहमीप्रमाणेच ग्राहकांची वर्दळ

पुणे : कोणत्याही परिस्थितीत व्यसनपूर्ती केलीच जात असल्याने सुरुवातीचे दोन दिवस वगळता देशी, विदेशी मद्यांच्या दुकानांमध्ये किंवा बिअरबारमध्ये नेहमीप्रमाणेच ग्राहकांची वर्दळ असून विशेषत: देशी दारुच्या दुकानांमध्ये सकाळपासूनच मद्यपींची अधिक लगबग असल्याचे चित्र आहे. ८ तारखेच्या रात्री मद्यविक्री करणारी रेस्टॉरंट, बार, परमिटरुम अशा ठिकाणी असलेल्या ग्राहकांना सुटे पैसे देण्याचा आग्रह झाला. दुसऱ्या दिवसापर्यंत संभ्रम होता. वाईनशॉपसह सर्व ठिकाणी ५०० व १०००च्या नोटा स्वीकारणार नसल्याचे फलक लावण्यात आले. मात्र, बाद नोटा ३० डिसेंबरपर्यंत स्विकारार्ह असल्याचे स्पष्ट झाल्यावर आणि व्यावसायिकांची खाती करंट अकाऊंटमध्ये असल्याने या नोटा काही प्रमाणात स्वीकारल्या जाऊ लागल्या.वाईन शॉपमध्ये एका क्वार्टरऐवजी (पावशेर) हाफ बाटली, दोन क्वार्टर, एक नाईंटी (छटाक) घेतल्यास वरचे सुटे पैसे दिले जात होते. मात्र, जवळ साठा करण्याची वेळ अनेक मद्यप्रेमींवर आली. या दुकानांमध्ये पाहणी करुन मद्यपींचा कानोसा घेतला असता एका तरुणाने सुट्या पैशांचा काही प्रश्नच येत नसल्याचे स्पष्ट केले. सकाळपेक्षा रात्री जास्त गर्दी असल्याचा अनुभवही त्याने सांगितला.बुधवार पेठेतील एक दुकानदार म्हणाले, देशी, विदेशी मद्य खरेदी करणा-यांच्या संख्येवर कसलाही परिणाम झालेला नाही. ज्यांना देशी दारु आवडते, ते तीच खरेदी करतात. ज्यांना बिअर किंवा वाईन, व्हिस्की आवडते ते तोच ब्रँड खरेदी करणार, अशी परिस्थिती आहे. देशी दारुच्या दुकानांमध्ये सकाळी गर्दी वाढल्याचे बोलले जाते. मात्र, बिअरबारमध्येही सकाळी नेहमीसारखीच वर्दळ असल्याचे आणि परमीटरुममधील ग्राहकही घटले नसल्याचे सांगण्यात आले. सुटे पैसे राखून ठेवण्याकडे या व्यावसायिकांच कल असतो. अगदीच नाईलाज असल्यास बंदी असलेल्या नोटाही स्वीकारणे भाग पडले.