शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बँकेत खाते नसलेले हादरले

By admin | Updated: November 16, 2016 02:22 IST

ज्या व्यावसायिकांनी बँकेत चालू खाते काढलेले नाही अथवा प्राप्तिकरही भरला नाही असे व्यावसायिक सध्या धास्तावले आहेत. नोटा बदलाबाबत असे

चिंचवड : ज्या व्यावसायिकांनी बँकेत चालू खाते काढलेले नाही अथवा प्राप्तिकरही भरला नाही असे व्यावसायिक सध्या धास्तावले आहेत. नोटा बदलाबाबत असे व्यापारी चिंतेत आहेत. सोशल मीडियातून येणारे उलट-सुलट मेसेज अशा व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. आता व्यवसाय कसा करायचा या चिंतेत अनेक जण दुकाने बंद ठेवत आहेत.नोटा बदलण्याच्या निर्णयाबाबत व्यापारी वर्गामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत. ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्याने सुट्या पैशांच्या तुटवड्याने दैनंदिन व्यवहार थंडावले आहेत. बंद झालेल्या नोटा बँकेत भरता येणार असल्या, तरी सध्या येणाऱ्या ग्राहकांकडून अशा नोटा घ्यायच्या की नाही या द्विधा मन:स्थितीत व्यापारी अडकले आहेत.गरजेच्या वस्तू खरेदीसाठी ग्राहक बाजारपेठेत जातात. मात्र, बंद झालेल्या नोटा व सुट्या पैशांची कमतरता यामुळे अडचणी येत आहेत. काही जण अजूनही बंद झालेल्या नोटा स्वीकारत असल्याने इतर व्यावसायिक या प्रकाराबाबत उलटसुलट चर्चा करीत आहेत. ग्राहक परत जाण्यापेक्षा मालाची विक्री करण्याकडे काही व्यावसायिक लक्ष देत आहेत. जुनी उधारी गोळा करण्याचे प्रकार जोमात आहेत. ५०० व १००० च्या नोटा भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत असल्याने अनेक जण आपापल्या पद्धतीने नोटा स्वीकारत आहेत. नोटा भरण्याच्या प्रक्रियेबाबत गैरसमज असल्याने अनेक व्यापारी चिंतेत आहेत. सोशल मीडियावर येणारे उलटसुलट मेसेज दिशाभूल करीत आहेत. बँकेत कशा प्रकारे व किती पैसे भरता येतात याबाबत अनेकांना माहिती नसल्याने हाच चर्चेचा विषय ठरत आहे.(वार्ताहर)