शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

रेशनिंगकार्ड ओळख पुरावा म्हणून नाहीच

By admin | Updated: October 8, 2014 05:20 IST

विधानसभा निवडणुकीकरिता छायाचित्र मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त अकरा प्रकारची छायाचित्र ओळखपत्रे मतदानासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार आहेत

पुणे : विधानसभा निवडणुकीकरिता छायाचित्र मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त अकरा प्रकारची छायाचित्र ओळखपत्रे मतदानासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार आहेत. यात रेशनकार्डचा समावेश नसल्याने लोकसभेप्रमाणे विधानसभेतही रेशनकार्डला रेड सिग्नल मिळाला आहे. ज्या मतदारांकडे फोटो व्होटर स्लीप असेल, त्यांना मात्र इतर ओळख दाखविण्याची गरज नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदानासाठी कोणती ओळखपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरावी, याचे परिपत्रक निवडणूक आयोगाने काढले आहे. त्यानुसार मतदारांकडे निवडणूक छायाचित्र ओळखपत्र नसेल, तर अकरा छायाचित्र ओळखपत्रांपैकी एक मतदार पुरावा म्हणून सादर करावा लागेल. जिल्ह्यातील सरासरी ९० टक्के मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत आहेत. त्यामुळे त्यांना फोटो व्होटर स्लीप मिळणे शक्य होणार आहे. प्रशासनाने व्होटर स्लीप वाटण्याची मोहिमही हाती घेतली आहे. मात्र, ज्यांच्याकडे फोटो व्होटर स्लीप नसेल व ज्यांनी मतदारयादीेंमध्ये छायाचित्र दिलेले नाही, त्यांना पुरावा सादर करावा लागेल. मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगाने रेशनकार्ड ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्या वेळी विविध राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे रेशनकार्ड पुरावा मानला जावा, यासाठी विनंती केली होती. त्यानंतर आयोगाने रेशनकार्डवर नावे असलेल्या सर्व व्यक्ती मतदानासाठी एकत्र असल्यास त्यांच्यासाठी रेशनकार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे मान्य केले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी ओळखपत्र यादीतून पुन्हा एकदा रेशनिंगकार्ड वगळण्यात आले आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांकडे शिधापत्रिके व्यतिरिक्त कोणतेही ओळखपत्र नसते. त्यांच्याकडे रेशनकार्ड हा एकमेव पुरावा असतो. अशा मतदारांसाठी हे अडचणीचे ठरू शकते. राज्यात बोगस शिधापत्रिकांची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर उघडकीस आल्याने निवडणूक आयोगाने रेशनिंगकार्डला पुराव्याच्या यादीतून बाहेर काढले आहे. मतदाराने मतदानासाठी कोणता पुरावा सादर केला, याची नोंद मतदान केंद्रस्तरीय अधिकाला रजिस्टरमध्ये करायची असून, ओळखपत्राचा क्रमांकही यात नोंदवावा लागणार आहे. (प्रतिनिधी)