शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नो-पार्किंगचे फलक देखावाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 03:40 IST

मोठ्या वर्दळीच्या हडपसर-सासवड मार्गावर भेकराईनगर बसस्थानकासमोर नो-पार्किंगच्या फलकांसमोरच अवजड व इतर वाहने पार्क करत असूनही हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस कोणतीच कारवाई करत नाहीत.

फुरसुंगी : मोठ्या वर्दळीच्या हडपसर-सासवड मार्गावर भेकराईनगर बसस्थानकासमोर नो-पार्किंगच्या फलकांसमोरच अवजड व इतर वाहने पार्क करत असूनही हडपसर वाहतूक विभागाचे पोलीस कोणतीच कारवाई करत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी दररोजच वाहतूककोंडी व अपघात घडत असताना वाहतूक पोलीस मात्र दुसरीकडे दुचाकी व चारचाकी अडवण्यातच व्यस्त असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नो-पार्किंगच्या फलकासमोर वाहने लावणाºया या मुजोर वाहनचालकांवर कोण कारवाई करणार, असा सवाल नागरिकांना पडला आहे.हडपसर-सासवड मार्गावर सातववाडी, गोंधळेनगर, भेकराईनगर, तुकाईदर्शन आदी ठिकाणी मुख्य रस्त्यावर जागोजागी नो-पार्किंगचे फलक लावले आहेत. मात्र या फलकांचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. कारण नो-पार्किंगमध्ये गाड्या लावणाºयांवर हडपसर वाहतूक पोलिसांकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. कारवाई ही केवळ रस्त्यावरून जाणाºया वाहनांना अडवूनच केली जाते. त्यामुळे नो पार्किंगमध्ये गाड्या पार्क करूनही हे बेशिस्त वाहनचालक अगदी बिनधास्त असतात. पोलिसांचा कोणताच धाक अथवा दंडाची भीती त्यांना नसते. त्यामुळे या मार्गावरील, हॉटेल, हॉस्पिटल, बँक, शाळा इतर व्यावसायिकांनी कोणतीही स्वतंत्र पार्किंगची सोय केली नसल्याने या ठिकाणी येणारे ग्राहक भर रस्त्यातच वाहने पार्क करत असल्याने रस्ता अरुंद होऊन पादचारी व ज्येष्ठ नागरिकांना तर रस्त्यावरून चालणेही धोक्याचे झाले आहे. या मार्गावरील सर्व बस थांब्यांवर काही व्यावसायिकांनी अतिक्रमण करून स्वत:ची दुकाने थाटलेली आहेत. त्यामुळे प्रवासी रस्त्यावर भर उन्हापावसात उभे राहतात. या व्यावसायिकांवरही कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळेनो- पार्किंगचे फलक केवळ देखावाच ठरत आहेत.या मार्गावर तुकाईदर्शन चौक, भेकराईनगर चौक, बसस्थानकासमोर दररोज तासन्तास कोंडीमुळे नागरिक हैराण झालेले असताना यासाठी कारणीभूत असणाºयांवर कारवाईस वाहतूक पोलीस व संबंधित प्रशासन का धजवत नाही? असा सवाल नागरिकांनी केला आहे.हडपसर वाहतूक पोलीस व संबंधित प्रशासनाने रस्त्यात अतिक्रमण करणारे व नो पार्किंगमध्ये गाड्या पार्क करणाºयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.