शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम नियमित करण्यासाठी सोसायटीच्या एनओसीची नाही गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 06:24 IST

शहरातील ज्या फ्लॅटमालकांनी अनधिकृतपणे अंतर्गत बदल केले आहेत. परंतु आता ज्या फ्लॅटधारकांना दंड भरून अंतर्गत बदल व केलेले अतिरिक्त बांधकाम नियमित करायचे आहे, त्यांना सोसायटीचे ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याची गरज पडणार नाही.

पुणे : शहरातील ज्या फ्लॅटमालकांनी अनधिकृतपणे अंतर्गत बदल केले आहेत. परंतु आता ज्या फ्लॅटधारकांना दंड भरून अंतर्गत बदल व केलेले अतिरिक्त बांधकाम नियमित करायचे आहे, त्यांना सोसायटीचे ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याची गरज पडणार नाही. याबाबत महापालिकेचा बांधकाम विभाग लवकरच नवीन धोरण आणार आहे.महापालिकेची परवानगी घेतल्यानंतर अनेक बांधकाम व्यावसायिक अथवा स्वतंत्र फ्लॅटधारकांनी अतंर्गत बदल अथवा अतिरिक्त बांधकाम केले आहे. परवानगी न घेता केलेले कोणतेही बदल अथवा बांधकाम हे अनधिकृत ठरते. शासनाच्या धोरणानुसार अशी अनधिकृत बांधकामे दंड भरून नियमित करण्यात येतात. परंतु यासाठी वैयक्तिक फ्लॅटधारकांना हे अनधिकृत बदल, बांधकाम नियमित करण्यासाठी सोसायटीची परवानगी घेणे आवश्यक आले. अनेक वेळा सोसायट्यांकडून अशी परवानगी दिली जात नाही. यामुळे वैयक्तिक फ्लॅटधारकांना अडचणी येतात.राज्य शासनाने १९९७ मध्ये अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. राज्याच्या निर्देशानुसार नगरविकास विभागाने अनधिकृत इमारतींना दंड भरून कायदेशीर मान्यता देण्यात येते. यासाठी शासनाने ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी करण्यात आलेली सर्व निवासी, व्यापारी, आणि औद्योगिक क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमित केली जाऊ शकतात. पालिकेकडे आतापर्यंत शंभरहून अधिक अर्ज आले असून, पैकी अनेक खासगी बंगल्यांचे आहेत.ज्या स्वतंत्र फ्लॅटमालकांनी त्यांच्या फ्लॅटसमध्ये अतंर्गत बदल केले आहेत. त्यांना दंड भरून परवानगी न घेता केलेले बदल नियमित करता येऊ शकतात. परंतु त्यासाठी सध्या संबंधित फ्लॅटमालकाला सोसायटीची एनओसी घेणे बंधनकारक आहे. परंतु अनेक फ्लॅटधारकांना सोसायट्या अशी परवानगी देत नाही, यामुळे दंड भरण्याची तयारी असूनदेखील काहीच करता येत नाही. यामुळे स्वतंत्र फ्लॅटधारकांसाठी सोसायटीची एनओसीची गरज नाही, असे धोरण महापालिका तयार करीत असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.- प्रशांत वाघमारे, मुख्य शहर अभियंता

टॅग्स :Puneपुणे