शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

तक्रार पुस्तिकेची माहितीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:55 IST

पेट्रोल कमी भरले जाणे, हवा भरण्यासाठी पैैसे घेणे, पेट्रोल मोजून देण्यास नकार अशा विविध कारणांवरून शहरातील पेट्रोल पंपांवर ग्राहक आणि कर्मचारी यांचे सातत्याने वाद होत असतात.

- प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : पेट्रोल कमी भरले जाणे, हवा भरण्यासाठी पैैसे घेणे, पेट्रोल मोजून देण्यास नकार अशा विविध कारणांवरून शहरातील पेट्रोल पंपांवर ग्राहक आणि कर्मचारी यांचे सातत्याने वाद होत असतात. पेट्रोल पंपावरील कोणत्याही स्वरूपाची तक्रार नोंदवण्यासाठी कंपनीतर्फे तक्रार पुस्तिका दिली जाते. पेट्रोल पंप एजन्सी देताना कंपनी व चालक यांच्यात करार होत असतो. त्यात ग्राहकांना द्यायच्या विविध सुविधांचे कलम असते. असुविधांचा सामना करावा लागल्यास ग्राहकांना तक्रार पुस्तिकेमध्ये नोंद करता येते. तक्रारीचे निवारण होईपर्यंत पाठपुरावा करता येतो. मात्र, बरेचदा याबाबत ग्राहक आणि पेट्रोल पंपावरील कर्मचारी अनभिज्ञ असल्याचे चित्र ‘लोकमत’ पाहणीतून समोर आले आहे.पेट्रोल कंपनीतर्फे प्रत्येक पेट्रोल पंपाकडे तक्रार पुस्तिका दिली जाते. ग्राहकांना कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवायची असल्यास या पुस्तिकेमध्ये आपले नाव, संपर्क क्रमांक, तक्रारीचे स्वरूप, दिनांक, तक्रार निवारण किती झाले की नाही, झाले असल्यास किती दिवसांत अशा स्वरूपाची माहिती लिहिण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. सेल्स आॅफिसरतर्फे दर एक-दोन महिन्यांनी या पुस्तिकेचे लेखापरीक्षण केले जाते. मात्र, बरेचदा पेट्रोलपंप चालकांकडून या सुविधेकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे ग्राहकांना या सुविधेबाबत काहीच माहिती नसल्याचे निदर्शनास आले. पेट्रोल पंपावर सेल्स आॅफिसरचे नाव आणि संपर्क क्रमांक दर्शनी भागावर लावलेला असतो. त्या क्रमांकावर संपर्क साधूनही आपली तक्रार नोंदवता येऊ शकते.एक ग्राहक पेट्रोल भरुन झाल्यावर हवा भरण्यासाठी जातो. हवा भरुन झाल्यावरमुलगा : साहेब पाच रुपये द्या.ग्राहक : येथे हवा मोफत भरुन दिली जाते ना? मग पैैसे कसले?मुलगा : टीप द्या साहेब.ग्राहक : परवानगी नसताना पैैसे मागितलेस तर पुस्तिकेमध्ये तुझी तक्रार नोंदवेन.मुलगा : कसली पुस्तिका? अशी कोणतीही सोय इथे नाही.महिला : मी ३५० रुपयांचे पेट्रोल भरायला सांगितले होते. तुम्ही ३०० रुपयांचेच भरले आहे.कर्मचारी : मॅडम, मी व्यवस्थित पेट्रोल भरले आहे. तुम्ही काटा नीट पाहिला नाही.महिला : मला खात्री आहे की तुम्ही पेट्रोल पूर्ण भरलेले नाही. मला मोजून हवे आहे.कर्मचारी : मॅडम मागे मोठी रांग लागली आहे, तुम्ही पुढे व्हा, हुज्जत घालू नका.महिला : पूर्ण खात्री झाल्याशिवाय मी येथून हलणार नाही. मला तक्रार नोंदवायची आहे तक्रार पुस्तिका द्या.कर्मचारी : कसली पुस्तिका? तुम्ही मॅनेजरशी बोला.कंपनीने प्रत्येक पेट्रोल पंपावर तक्रार पुस्तिका उपलब्ध करून दिलेली असते. यामध्ये तक्रार नोंदवण्याचा, तक्रार निवारणासाठी पाठपुरावा करण्याचा ग्राहकांना पूर्ण अधिकार असतो. कोणत्याही चालकाने पुस्तिकेबाबत उदासीनता दाखवल्यास कंपनीकडे अथवा ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवता येऊ शकते.- पेट्रोल पंपचालकपेट्रोलियम डीलर असोसिएशनतर्फे ग्राहकांना पेट्रोल पंपावरील असुविधांबाबत तक्रार नोंदवता येते. ग्राहकांना प्रथम व्यवस्थापकाशी संपर्क साधता येतो. व्यवस्थापकाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पेट्रोल पंपाच्या मालकाकडे तक्रार नोंदवता येते. यानंतरही ग्राहकाचे समाधान न झाल्यास ग्राहकांना लेखी तक्रार नोंदवण्यासाठी तक्रार पुस्तिका उपलब्ध करून दिली जाते. आॅईल कंपनीकडून समस्येचे निराकरण न झाल्यास ग्राहक सेल्स आॅफिसरशी संपर्क साधून पाठपुरावा करु शकतात. ग्राहकांच्या कोणत्याही तक्रारीचे निवारण करण्यासाठी असोसिएशन कायमच कटिबद्ध आहे.- सुमीत धुमाळ, अध्यक्ष, पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन, पुणे.>हवा भरण्यासाठी पैसे....अनेक पेट्रोल पंपांवरील मुले हवा भरण्यासाठी पैशांची मागणी करतात. प्रत्यक्षात, हवेच्या मशीनजवळ ‘नो टिप्स प्लीज’ असे लिहिलेले असते. तरीही पैसे मागितले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून नोंदवली जाते. याबाबत मॅनेजरशी बोलून तोडगा काढता येऊ शकतो.मी पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेले असता, पेट्रोलमध्ये भेसळ असल्याची शंका आली. याबाबत मी कर्मचाऱ्याला जाब विचारला असता त्याने मॅनेजरशी बोलण्यास सांगितले. मॅनेजरने आमच्या पंपावर भेसळ होत नसल्याने ठामपणे सांगितले. त्या वेळी पेट्रोल पंपावरील पुस्तिकेबाबत मला माहीत नव्हते. सेल्स आॅफिसरबाबतही फारशी माहिती नव्हती. त्यामुळे तक्रार नोंदवता आली नाही. - स्वाती पिंगळे, ग्राहक

टॅग्स :Petrolपेट्रोल