शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पिरंगुट येथे नाही अग्निशामक केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पिरंगुट उद्योग परिसरात अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. यात केमिकल कंपन्यांचाही समावेश आहे. या कंपन्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पिरंगुट उद्योग परिसरात अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. यात केमिकल कंपन्यांचाही समावेश आहे. या कंपन्या कररूपात ग्रामपंचायतीला मोठी रक्कम दरवर्षी देत असतात. या ठिकाणी अग्निशमन केंद्राची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र, ती अद्यापही पूर्ण झालेली नाही. यामुळे एखादी दुर्घटना झाल्यास पीएमआरडीएच्या हिंजवडी, मान, म्हारुंजी, नांदेड या केंद्रांवरील बंबावर नागरिकांना अवलंबून राहावे लागते. यामुळे घटनास्थळी पोहचण्यास अनेक वेळा उशीर झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

पिरंगुट जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. येथील उद्योगांमुळे येथे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. नागरिकांचा विचार करता या ठिकाणी उपाययोजना होणे गरजेच्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून कुठलीच दखल घेतली जात नाही. हा परिसर पीएमआरडीएच्या हद्दीत येतो. या ठिकाणी विकासकामे राबविण्याची जबाबदारी पीएमआरडीएची आहे. मात्र, पायाभूत सुविधांचा अभाव येथे आहे. येथील कंपन्यात आगीच्या घटना या नेहमीच होतात. काही कंपन्यांत स्वत:च्या फायर सिस्टिम आहेत. मात्र, अनेक कंपन्यांत त्या नाहीत. आग लागल्यास ती विझवण्यासाठी स्थानिक टँकरवर किंवा पीएमआरडीएच्या म्हारुंजी, नांदेड, हिंजवडी, माण येथील केंद्रांवर अवलंबून राहावे लागते. घटनेची माहिती मिळाल्यावर बंब पोहचण्यास विलंब होत असतो. त्यात येथील रस्त्यांचीही दुरवस्था असल्याने घटनास्थळी पोहचण्यास विलंब होतो.

एवढा मोठा उद्योग परिसर असताना त्याठिकाणी स्वतंत्र अग्निशमन केंद्र असणे गरजेचे आहे. येथील कंपन्यांनीही तशी मागणी वारंवार प्रशासनाकडे केली आहे; मात्र अद्यापही त्यांची मागणी पूर्ण झाली नाही.

चौकट

अग्निशमन केंद्रासाठी जागेची पाहणी

पिरंगुट येथील उद्योग परिसर पाहता या ठिकाणी स्वतंत्र अग्निशमन केंद्र असावे, अशी मागणी खूप दिवसांपासूनची आहे. आगीची घटना झाल्यास हिंजवडी, म्हारुंजी, माण येथील बंब उपलब्ध होतात; पण येथील लोकसंख्येच्या दृष्टीने येथेच केंद्र असणे गरजेचे आहे. यासाठी उद्योगांनी एक जागा सुचवली होती. तसेच आमच्याकडूनही तीन जागांची पाहणी पूर्ण झाली आहे. लवकरच हे केंद्र उभारणीसाठी प्रयत्न केले जातील.

- अभय चव्हाण, तहसीलदार