प्रवासी संख्या, पुणे स्थानक-२०हजार
फलाट तिकीट विक्री सध्याची-२४ तासात ३००
कोरोनाआधीची विक्री : १०००
फलाट तिकीट सध्याचे-५० रूपये
आधीचे-२० रूपये
फलाटावर सर्वसामान्यांना बंदीच आहे. ५० रूपये हे फलाट तिकीट आत यावेच लागेल अशा गरजवंतासाठीच आहे. त्यामुळे फलाटावर गर्दी होत नाही. या नियमाने फलाट तिकीटापासून मिळणारे उत्पन्न घटले आहे. पुढील आदेश येईपर्यंत असेच राहिल.
- मनोज झंवर, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग
---
फलाट तिकीट कमी होते त्यावेळी स्थानकाचा अतीशय अयोग्य वापर होत असायचा. चालणे मुश्कील व्हायचे. आता स्थानकात गर्दी नसते. तिकिट वाढवले हे चांगलेच झाले, पण नातेवाइकांना निरोप देण्यासाठी कोणालाच येता येत नाही ही एक गोष्ट वाईट झाली. जादा तिकिट ही तात्पुरती व्यवस्था आहे व सध्या ती आवश्यक आहे.
- उदय महाले, नियमित रेल्वे प्रवासी