शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या उत्पन्नाला मंदीची झळ

By admin | Updated: March 31, 2017 03:03 IST

महापालिकेच्या उत्पन्नामध्ये स्थानिक संस्था कर (एलबीटी), मिळकतकर, बांधकाम विकास शुल्क, पाणीपट्टी यांचा समावेश

पुणे : महापालिकेच्या उत्पन्नामध्ये स्थानिक संस्था कर (एलबीटी), मिळकतकर, बांधकाम विकास शुल्क, पाणीपट्टी यांचा समावेश आहे. मात्र सध्या मंदीची परिस्थिती असल्याने या उत्पन्नाला मोठा फटका बसल्याचे चित्र दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये (२०१६-१७) तब्बल १७०० कोटी रुपयांची तूट आली आहे. त्यामुळे उत्पन्नाचे पर्यायी मार्ग वाढविण्यावर भर देणे आवश्यक होते, मात्र प्रशासनाकडून त्याबाबत फारसे प्रयत्न झालेले दिसून येत नाहीत.महापालिकेने २०१६-१७ या वर्षासाठी ५ हजार ७४८ कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट निश्चित केले होते. मात्र डिसेंबर २०१६ पर्यंत केवळ २ हजार ६१८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. बांधकाम विभागाच्या उत्पन्नात तब्बल ३१८ कोटी रुपयांनी घट झाल्याचे दिसून येत आहे.बांधकाम विभागाला चालू वर्षी ४७० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. बांधकाम परवानगी आणि प्रीमियमच्या माध्यमातून हे उत्पन्न मिळाले. मागील वर्षी बांधकाम विभागाला (२०१५-१६) मध्ये ७८८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. या तुलनेत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. मिळकत कर विभागाला या वर्षी ११३१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी मिळकत कर विभागाला ११०६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. याबाबत कुणाल कुमार यांनी सांगितले, ‘‘महापालिकेला मिळकत करातून चांगले उत्पन्न अपेक्षित आहे. शहरातील सर्व मिळकतींचा सर्व्हे केला जात आहे, त्यातून मिळकत कर लागू नसलेल्या अनेक मिळकती उजेडात येणार आहेत. त्यामुळे उत्पन्नात वाढ होऊ शकेल. पाणीपट्टीच्या वाढीतून मिळालेली रक्कम स्वतंत्र खात्यामध्ये ठेवली जाणार आहे. ही रक्कम २४ तास पाणीपुरवठा या योजनेवरच खर्च केली जाणार आहे. त्याचबरोबर प्रीमियम एफएसआयतूनही पालिकेला वाढीव उत्पन्न मिळू शकणार आहे.’’पुढील वर्षात विकासकामांसाठी २ हजार ७१४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये भांडवली कामे, क्षेत्रीय कार्यालयाकडून करायची कामे, वॉर्डस्तरीय निधी यांचा समावेश आहे. उत्पन्न गाठणे अवघडआगामी २०१७-१८ या वर्षासाठी ५६०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये स्थानिक संस्था करापोटी १७३० कोटी, मिळकत करापोटी १३३३, विकास शुल्क १०२५ कोटी, पाणीपट्टी ३१९ कोटी, शासकीय अनुदान ३२९ कोटी, इतर जमा ६०१ कोटी, कर्जातून २६१ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. मात्र मंदीचे वातावरण असल्यामुळे या इतके उत्पन्न गाठणे अवघड जाणार आहे.आकाशचिन्हाच्या उत्पन्नाकडे दुर्लक्षशहरात जाहिरातीसाठी परवानगी देण्यातून मोठे उत्पन्न आकाशचिन्ह विभागाला मिळू शकेल. मात्र, अंदाजपत्रक तयार करताना आकाशचिन्ह विभागाच्या उत्पन्नाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर अग्निशमन दलाचे उत्पन्न वाढविण्यावरही भर देण्यात आलेला नाही.