शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे ‘नगर’सेवक होणार पुन्हा वॉर्डसेवक

By admin | Updated: December 19, 2014 23:46 IST

राज्य मंत्रिमंडळाने एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीचा निर्णय घेतल्याने महापालिकेसाठी इच्छुकांमध्ये ‘कही खुशी कही गम’ आहे.

पुणे : राज्य मंत्रिमंडळाने एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीचा निर्णय घेतल्याने महापालिकेसाठी इच्छुकांमध्ये ‘कही खुशी कही गम’ आहे. बहुसदस्यीय पद्धतीमध्ये स्थानिक नगरसेवकांकडून संपूर्ण नगराचा (शहराचा) विकास अपेक्षित असतो. परंतु, नव्या एक सदस्यीय पद्धतीने पुन्हा नगरसेवक हे वॉर्डाचे सेवक होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुकीमध्ये सर्व जाती-धर्म व अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व मिळावे म्हणून बहुसदस्यीय पद्धती आली. त्यामुळे एखाद्या भागात प्रभाव असलेल्या गुंडगिरीला आळा बसविण्याचा हेतू होता. परंतु, राज्य घटनेनुसार एका व्यक्तीला एकच मतदान करता आले पाहिजे. २ ते ४ सदस्यांच्या प्रभाग पद्धतीमध्ये एका व्यक्तीला ४ मते देण्याचा अधिकार मिळाला होता. त्यावर काही राजकीय संघटनांनी न्यायालयात दाद मागितली होती. सध्या पुणे महापालिकेत दोन सदस्यीय ७६ प्रभागांतून १५२ नगरसेवक निवडून आलेले आहेत. ५० टक्के महिला आरक्षण आहे. प्रभागात एकाच अथवा वेगवेगळ्या पक्षाचे दोन सदस्य निवडून आले. त्यांनी मिळून एकत्रित संपूर्ण नगराचा विकास करणे अपेक्षित होते. परंतु, प्रभाग पद्धतीमध्ये विकासाच्या निधीवरून वाद सुरू झाले. त्यामुळे अपेक्षित विकास होण्याऐवजी कुरघोडीचे चित्र आहे. निवडणुका पुन्हा वॉर्ड पद्धतीने होणार असल्याने स्थानिक कार्यकर्ते खूश आहेत. ज्या वॉर्डात संबंधित नगरसेवकांचा अथवा कार्यकर्त्यांचा प्रभाव आहे. विकासकामे आणि जनसंपर्क आहे, त्याला संधी मिळेल, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. परंतु, ५० टक्के महिला आरक्षणामुळे संंबंधित प्रभागांत त्याच कार्यकर्त्याला संधी मिळेल, याची खात्री नाही. एखाद्या भागात सलग महिला आरक्षण पडू शकते. त्या ठिकाणी चांगल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)