शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या सव्वा लाख जागा रिक्त, प्रवेश प्रक्रिया बंद केली जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 05:47 IST

राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद या सहा शहरांमध्ये अकरावीच्या सुमारे सव्वालाख जागा अद्याप रिक्त आहेत. प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची मंगळवारपासून अखेरची फेरी घेऊन प्रवेश प्रक्रिया बंद केली जाणार आहे. मात्र त्यानंतरही रिक्त जागा फारशा कमी होण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पुणे : राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद या सहा शहरांमध्ये अकरावीच्या सुमारे सव्वालाख जागा अद्याप रिक्त आहेत. प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची मंगळवारपासून अखेरची फेरी घेऊन प्रवेश प्रक्रिया बंद केली जाणार आहे. मात्र त्यानंतरही रिक्त जागा फारशा कमी होण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.राज्यात सहा प्रमुख शहरांमध्ये एकाच वेळापत्रकानुसार अकरावीची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. शिक्षण विभागाने पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद असे सहा स्वतंत्र विभाग केले आहेत. मुंबईमध्ये सर्वाधिक २ लाख ९७ हजार ३१५ एवढी प्रवेश क्षमता आहे. या सहा विभागांमध्ये एकूण प्रवेशक्षमता ५ लाख ९ हजार ६१० आहे. त्यासाठी ३ लाख ९३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. सर्वच ठिकाणी उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्जांची संख्या कमी आहे.प्रवेशाच्या एकूण सात फेºया झाल्या. एकूण अर्जांपैकी ९७ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. केंद्रीय प्रवेशामधून सुमारे ३ लाख ४ हजार, तर कोट्यातून सुमारे ८० हजारविद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे अद्याप १ लाख २४ हजारजागा रिक्त आहेत. त्यापैकी ६६ हजार जागा मुंबईतील आहेत. आठव्या फेरीमध्ये जास्त प्रवेश होण्याची शक्यता नाही. त्यामुळे रिक्त जागांचा आकडा फारसा कमी होण्याची शक्यता नाही.सध्या सुरू असलेल्या आठव्या ‘प्रथम येणाºयास, प्रथम प्राधान्य’ या फेरीसाठी रिक्त जागांची माहिती १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. १९ ते २५ सप्टेंबर या कालावधीत आॅनलाइन प्रवेश निश्चित करता येणार आहे. ही अखेरची संधी असेल, अशी माहिती केंद्रीय प्रवेश समितीकडून देण्यात आली.