पुणे : कर्वेनगरमधील ४० वर्षीय तरुणाचा एका खासगी रुग्णालयात गुरुवारी (दि. ९) रात्री स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. यामुळे मार्च महिन्यात स्वाइन फ्लूने निधन झालेल्या रुग्णांची संख्या ५, तर २०१७मधील हा नववा बळी ठरला आहे. सध्याचे वातावरण स्वाइन फ्लूच्या विषाणूच्या वाढीस पोषक असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.४० वर्षीय रुग्णाला १७ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वाइन फ्लूमुळे जानेवारी महिन्यात २, फेब्रुवारीत २ तर मार्च महिन्यात ५ रुग्णांचा मृत्यू झाला. जानेवारीपासून आतापर्यंत पुण्यात स्वाइन फ्लूच्या ४८ रुग्णांची नोंद झाली आहे.
पुण्यात स्वाइन फ्लूचा नववा बळी
By admin | Updated: March 11, 2017 03:38 IST