शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीस चाले खेळ ‘घरफोड्यांचा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 01:32 IST

गतवर्षी ६०० घरफोड्या : कोथरूड-वारजे माळवाडीत रात्रीच्या, तर हडपसर, कोंढव्यात सर्वाधिक घटना

पुणे : अत्याधुनिक सोयीसुविधा, त्याला माहिती व तंत्रज्ञानाची जोड देत गुन्ह्याचा प्रभावीपणे शोध घेण्यास सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या पुणे पोलीस प्रशासनासमोर येत्या काळात घरफोड्या रोखण्याचे मोठे आव्हान आहे. शहरातील कोथरूड आणि वारजे माळवाडीत रात्रीच्या, तर हडपसर, कोंढवा भागात दिवसा सर्वाधिक संख्येने घरफोड्या झाल्यास दिसून आले आहे. मागील वर्षी तब्बल एकूण ६०० घरफोड्यांचे गुन्हे दाखल केले आहे. यात दिवसा १३६ तर रात्री ४६४ घरफोड्या, तर २०१७ मध्ये हे प्रमाण ७५३ इतके होते. यात २१४ घरफोड्या दिवसा तर ५३९ घरफोड्या रात्रीच्या वेळी आहेत.

कोथरूड, वारजे माळवाडी, उत्तमनगर, सिंहगड रस्ता, दत्तवाडी या परिसरात रात्रीच्या वेळी १११ घरफोड्या झाल्या आहेत. यापैकी केवळ ४५ गुन्हे उघड झाले आहेत. २०१७ काळात या भागात १३० घरफोड्यांचे गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ७० गुन्हे उघड झाले होते. दिवसा घरफोड्यांमध्ये हडपसर आणि कोंढवा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भरदिवसा तिथे होणाऱ्या मोठ्या घरफोड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील वर्षी या परिसरात दिवसा ५० घरफोड्यांचे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी २७ गुन्हे उघड झाले. २०१७ मध्ये ५४ दिवसा घरफोडीचे गुन्हे दाखल झाले तर त्यापैकी ३० गुन्ह्यांची उकल करण्यात आली.

पुणे शहर पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार २०१८ मध्ये दिवसा घरफोडीचे १३६ गुन्हे, तर ४६४ रात्रीच्या घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी अनुक्रमे ६१ व २११ गुन्हे उघड झाले असून, घरफोडीच्या गुन्हे उघड होण्याची टक्केवारी ४५ टक्के असल्याचे दिसून आले आहे. यामुळे या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये पोलीस प्रशासनाकडून प्रभावीपणे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. हडपसर, कोंढवापाठोपाठ चतु:शृंगी आणि चंदननगर भागात देखील मोठ्या प्रमाणात दिवसा घरफोड्या होत आहेत. दिवसा २८ घरफोड्यांची नोंद या भागात झालीअसून, त्यापैकी १२ गुन्हे उघड झाले आहेत.

केवळ रात्रीच्याच नव्हे तर दिवसांच्या घरफोडीच्या बाबत कोथरूड, वारजे माळवाडी आणि सिंहगड रस्ता परिसरातील नागरिक अधिक चिंतेत आहेत.या परिसरात ३५ घरफोड्या झाल्या. २०१७ मध्ये हे प्रमाण ७७ इतके होते. त्यापैकी ५६ गुन्हे उघड झाले. मात्र २०१८ मधील ३५ गुन्हयांपैकी केवळ १२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आल्याचे आकडेवारीवरून सिद्ध होत आहे. शहरातील डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट, कोरेगाव पार्क भाग तुलनेने अधिक सुरक्षित असल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे.१० ते १५ किमीच्या अंतरात घरफोड्यारात्रीच्या वेळी उशिरापर्यंत पोलीस शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये गस्त घालत असतात. असे असताना देखील घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. मुख्य शहरापासून किमान १० ते १५ किमीच्या परिसरात घरफोड्या होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे. एकीकडे नवनवीन तंत्रज्ञानाची मदत घेऊन पोलीस प्रशासनाला हायटेक करू पाहणाºया पोलीस प्रशासने घरफोड्यांचे प्रमाण कसे रोखता येईल याचा गांभीर्याने विचार करावा, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून दिल्या जात आहेत.सीसीटीव्ही बसवण्याची मागणीभविष्यात घरफोड्यांचे प्रमाण आटोक्यात आणण्याकरिता शहराच्या ज्या परिसरातून सर्वाधिक प्रमाणात घरफोड्या होत आहेत, त्या भागातील जवळच्या एखाद्या रस्त्यावर, सिग्नलवर, याशिवाय चौकातील मुख्य ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त सीसीटीव्ही बसविण्याची योजना नागरिकांमधून पुढे येत आहे.