शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस शिपायाच्या अंगावर घातली मोटार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 02:36 IST

वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांनी वाहतूक परवाना मागत काळ्या काचांबाबत विचारणा केल्याच्या रागातून दोन महिला आणि एका पुरुषाने त्यांना शिवीगाळ करत त्यांच्याशी धक्काबुक्की केली.

पुणे - वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांनी वाहतूक परवाना मागत काळ्या काचांबाबत विचारणा केल्याच्या रागातून दोन महिला आणि एका पुरुषाने त्यांना शिवीगाळ करत त्यांच्याशी धक्काबुक्की केली. त्यानंतर एका पोलीस शिपायाच्या अंगावरच मोटार घालत धडक देऊन त्यांना जखमी करून ते तेथून पळून गेले़ ही घटना कोरेगाव पार्क जंक्शन ते मोरओढा चौक रस्त्यावर शनिवारी सायंकाळी सहा वाजता घडली़याप्रकरणी पोलीस शिपाई पांडुरंग पवार यांनी फिर्याद दिली असून, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : पांडुरंग पवार तसेच त्यांचे सहकारी के. जे. पावसकर व शागिर्द शेख हे कोरेगाव पार्क वाहतूक विभागात कार्यरत आहेत. शनिवारी सायंकाळी ते कोरेगाव पार्क जंक्शन ते मोरओढा चौक या दरम्यान वाहतूक नियमन करत असताना एक मोटार तेथे आली.मोटारीच्या चालकाकडे पवार यांनी परवाना मागून मोटारीला असलेल्या काळ्या काचांबाबत विचारणा केली. त्या वेळी चालकाने पोलिसांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली. तसेच, मोटारीमध्ये असलेल्या महिलांनी पोलीस शिपाई शेख यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून जात त्यांचा शर्ट ओढला.त्यानंतर तिघेही मोटारीमध्ये बसले आणि ती सुरू करून शेख यांना धडक देऊन तेथून निघून गेले. त्यात पोलीस शिपाई शेख हे जखमी झाले आहेत. कोरेगाव पार्क पोलीस अधिक तपास करीत आहेत़

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या