पुणे: लोहियानगरमधील आठ घरांचे शॉर्ट सर्किटमुळे आग लागून नुकसान झाले. या कुटुंबियांना नगरसेविका मनीषा लडकत यांच्या वतीने वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक संदीप लडकत, सुशील मंडल, महेश चनमल, आसिफ खान, सचिन बांदल, विक्रम मोरे आदी उपस्थित होते.
दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली
पुणे: राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समिती, अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने लालमहाल येथे २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि नागरिकांना पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी मुकेश यादव, मीना जाधव, तानाजी शिरोळे, निशा मोरे, प्रसाद काळे आदी उपस्थित होते.