शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपातास नकार देणाऱ्या नवविवाहितेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 01:24 IST

माहेरहून पैसे व दागिने आणत नाही, तसेच गर्भपातासही नकार देणा-या नवविवाहितेला राहत्या घरात सासरच्या लोकांनी फाशी देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना पेठ (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. २७) घडली. याप्रकरणी मंचर पोलिसांनी सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

निरगुडसर - माहेरहून पैसे व दागिने आणत नाही, तसेच गर्भपातासही नकार देणाºया नवविवाहितेला राहत्या घरात सासरच्या लोकांनी फाशी देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना पेठ (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. २७) घडली. याप्रकरणी मंचर पोलिसांनी सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.पूनम स्वप्निल ढमाले (वय २५) असे झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पती स्वप्निल भरत ढमाले, सासू संगीता भरत ढमाले, सासरे भरत ढमाले, दिर निखिल भरत ढमाले, सुमित भरत ढमाले यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.पूनम ही विज्ञान शाखेची पदवीधर व पती स्वप्निल बारावी शिकलेला. त्याची पेठ येथे चायनीजची गाडी आहे. दोघांमध्ये प्रेम होते. तिच्या कुटुंबाचा लग्नाला विरोध होता. तिच्या आई-वडिलांचा विरोध असतानाही ७ महिन्यांपूर्वी दोघांनी विवाह केला. एका महिन्याने तिच्या आई-वडिलांची सहमती मिळाल्यानंतर आळंदीत नातेवाईकांच्या उपस्थितीत पुन्हा विवाह केला. लग्नानंतर दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. तिला वारंवार मारहाण करून माहेरून पैसे व दागिने घेऊन ये, असा तगादा लावला होता. त्यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला होता. ती तीन महिन्यांची गर्भवती होती. तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव आणला जात होता, अशी माहिती तपासात पुढे आल्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी सांगितले.गुरुवारी (ता. २७) सकाळी दहा वाजण्यापूर्वी तिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. वडील शाम भीमाजी सैद (रा. महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव) यांना घटना समजताच ते मंचर पोलीस ठाण्यात आले. ‘‘माझी मुलगी कधीही आत्महत्या करणार नाही. सासरच्या लोकांनी पूनमचा गळा दोरीने आवळून तिला ठार केले आहे,’’ अशी फिर्याद नोंदविली.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी भेट दिली. मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी रात्री शवविच्छेदन करण्यात आले. तिला फाशी दिल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद केले आहे. मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर तिच्यावर माहेरी महाळुंगे पडवळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पांचाळ अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Murderखूनnewsबातम्या