शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

एकीकडे नाराजी दुसरीकडे नवे चिन्ह; म्हणून मित्रपक्षांच्या मदतीवर भिस्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 10:04 IST

श्रीरंग बारणे-संजोग वाघेरे पाटील लढतीकडे सर्वांचे लक्ष

श्रीनिवास नागेलोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पुणे आणि रायगड जिल्ह्यांत विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात यावेळी शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात कडवा सामना होत आहे. मतदारसंघाच्या निर्मितीनंतर तिन्ही निवडणुकांत शिवसेनेने बाजी मारली असली, तरी पक्षातील फुटीनंतर समीकरणे बदलली आहेत. या निवडणुकीत दोन्ही गटांची भिस्त मित्रपक्षांच्या मदतीवर आहे.

पुण्याजवळील सांगवी-दापोडीपासून मुंबईजवळच्या घारापुरी लेण्यांपर्यंतचे क्षेत्र मावळ मतदारसंघात आहे. या मतदारसंघाची निर्मिती २००९ मध्ये झाली, तेव्हा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राबल्य दिसत होते. मात्र, पक्षातील अंतर्गत कुरघोड्या आणि गावकी-भावकीच्या राजकारणामुळे तिन्ही वेळा राष्ट्रवादीला शिवसेनेकडून पराभव पत्करावा लागला.

महायुतीतून शिंदेसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे तिसऱ्यांदा रिंगणात असून, मतदारसंघातील सर्व सहा आमदार महायुतीचे आहेत. त्यांची हॅट्ट्रिक चुकवण्यासाठी महाविकास आघाडीतून उद्धवसेनेचे संजोग वाघेरे-पाटील यांनी दंड थोपटले आहेत. 

भावकी-गावकीचे राजकारणn आतापर्यंत घाटावरील भागाचा नेहमीच वरचष्मा राहिल्यामुळे दोन्ही प्रबळ उमेदवार घाटावरील पिंपरी-चिंचवड शहरातील आहेत. n भावकी-गावकीच्या राजकारणामुळे हा परिसर बाहेरच्या उमेदवारांना सहसा स्वीकारत नाही. दोन्ही उमेदवारांची या परिसरात नातीगोती असून, दीर्घ राजकीय पार्श्वभूमीही आहे.

या प्रश्नांचे काय? n रेडझोन आणि पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे.n पिंपरी-चिंचवड शहराला होणारा अपुरा, अनियमित पाणीपुरवठा.n पुणे ते लोणावळा रेल्वेमार्गाचे रखडलेले चौपदरीकरण. n पवना धरणग्रस्तांचा मोबदला आणि परतावा, घाटाखालील आदिवासी पट्ट्यातील पाणीप्रश्न.n कर्जत-पनवेल परिसरातील बंद पडलेल्या कंपन्यांतील कामगारांपुढे आलेली बेरोजगारी हे प्रश्न ‘जैसे थे’ आहेत.

निवडणुकीतील कळीचे मुद्देबारणेंना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बळ असले, तरी मागील वेळी त्यांनी अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा पराभव केल्याने राष्ट्रवादीचा तो गट आता मदत करणार का? काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद तोकडी असली तरी रायगड जिल्ह्यातील शेकापची ताकद आणि मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाला मिळणारी सहानुभूती वाघेरेंच्या पाठीशी.प्रस्थापितांविरोधात असलेल्या नैसर्गिक नाराजीचा सामना करण्याची बारणेंना चिंता, तर नवा चेहरा आणि नवे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे वाघेरेंपुढे आव्हान.

२०१९ मध्ये काय घडले?श्रीरंग बारणे     (शिवसेना)     ७,२०,६६३पार्थ पवार     (राष्ट्रवादी)     ५,०४,७५०राजाराम पाटील     (वं.ब.आ.)     ७५,९०४नोटा         १५,७७९

टॅग्स :shrirang barneश्रीरंग बारणेsanjog waghere patilसंजोग वाघेरे पाटीलmaval-pcमावळmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४