शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

World Book Day : पुण्यात तरुण रुजवतायेत वाचन संस्कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 17:36 IST

पुण्यात विविध तरुणांचे गट एकत्र येत पुस्तकांच्या वाचनाचा उपक्रम राबवित असून या उपक्रमाला माेठा प्रतिसाद मिळत अाहे.

पुणे : फेसबुक, व्हाॅट्सअॅप, इंटरनेटने सगळ्यांच अायुष्य व्यापलं असलं तरी हे सगळं बाजूला ठेवून महिन्यातून किंवा अाठवड्यातून एकदा तरुणांचा गट एकत्र जमताे. प्रत्येकाच्या अावडीनिवडी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांची एक अावड काॅमन अाहे अाणि ती म्हणजे वाचन. पुण्यात एक अागळी-वेगळी तरुणांची वाचन संस्कृती रुजत असून तरुण दर महिन्यातून किंवा अाठवड्यातून एकदा भेटून पुस्तकांचं वाचन करीत अाहेत. त्यासाठीच्या त्यांच्या जागाही तितक्याच भन्नाट अाहेत. एकत्र येऊन पुस्तकाचं वाचन करताना तयार हाेणारा माहाेल तरुणांना भुरळ पाडत अाहे.   तरुण वाचत नाहीत अशी अाेरड हाेत असताना पुण्यातील तरुण याला अपवाद ठरत अाहेत. अापण वाचलं पाहिजे, त्यातून चर्चा झाली पाहिजे, विचार मंथन व्हायला हवं या उद्देशाने पुण्यात तरुणांकडून वाचनाचे विविध ग्रुप चालविले जातात. रिंगण, कानदृष्टी, वाचन अाेटा अशी विविध नावं या उपक्रमाला तरुणांनी दिली अाहेत. महिन्यातून किंवा अाठवड्यातून जसा वेळ मिळेल तसं भेटायचं एखादं पुस्तक एकाने वाचायचं अाणि बाकीच्यांनी एेकायचं. अाजच्या धकाधकीच्या अायुष्यात प्रत्येकाचं वाचन हाेत नाही. त्यातही एकाट्याने पुस्तक वाचायचं म्हंटलं की कंटाळा येताे. त्यामुळे ही वाचन अॅक्टीव्हीटी तरुणांसाठी एक पर्वणी ठरत अाहे. एखाद्याचं घर, शाळेचा हाॅल, कॅफे, बाग अश्या विविध ठिकाणी असे वाचन कट्टे भरत अाहेत.     नाेव्हेंबर 2015 मध्ये नेहा महाजन व त्यांचे सहकारी अपर्णा दिक्षित, अजित देशमुख, मयूर गिऱ्हे यांनी वाचन अाेटा या नावाने वाचन अॅक्टिव्हिटी सुरु केली. सुरुवातील घरी एकत्र जमून पुस्तकाचे वाचन केले जायचे. पुढे संख्या वाढल्याने शाळांच्या हाॅलमध्ये ही अॅक्टिव्हीटी करण्यात अाली. सध्या 30- 35 विविध क्षेत्रातील लाेक दर महिन्यातून एकदा एकत्र जमून पुस्तकाचे वाचन करतात. या अॅक्टिव्हीटीचे फेसबुक पेजही त्यांनी तयार केले असून त्याच्या माध्यमातून कार्यक्रमाची माहिती दिली जाते. अशीच नाटक कंपनी या नाटकाच्या संस्थेतर्फे कानदृष्टी ही अॅक्टीव्हीटी सुरु करण्यात अाली. या अॅक्टीव्हीटी बद्दल बाेलताना अनूज देशपांडे म्हणाला, अाम्ही नाटक करत असल्याने वाचन नाटकासाठी खूप महत्त्वाचे अाहे. त्यासाठी अाम्ही कानदृष्टी ही अॅक्टीव्हीटी सुरु केली. त्या माध्यमातून दर अाठवड्याला भेटून अाम्ही जुन्या लेखकांची नाटके वाचत असताे. त्यामुळे अापण ज्या क्षेत्रात काम करत अाहाेत त्याची माहिती मिळण्यास मदत हाेते.  

टॅग्स :Puneपुणेworld book dayजागतिक पुस्तक दिनcultureसांस्कृतिक