जगभरात ‘पुणे’ हे सर्वार्थानेच पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. अगदी विविध ऐतिहासिक स्थळं, पुणेरी पाट्या, पुणेकरांच्या शालजोडीतल्या कोट्यांपासून चितळ्यांच्या ‘बाकरवडी’पर्यंत पुण्याच्या चर्चा चवीने रंगतात. आता ‘आनंदी शहर’ अशी नवीन बिरुदावली लागल्याने पुणेकरांची मान नक्कीच अभिमानाने उंचावणार आहे. राज्यात सर्वेक्षण केलेल्या २५ शहरांपैकी पुणे, मुंबई आणि नागपूर या शहरांनी अव्वल यादीत स्थान मिळवले आहे. अखिल भारतीय सर्वेक्षणात नागपूरने १७ वे, तर मुंबईने २१ वे स्थान मिळविले आहे. संपूर्ण देशभरात ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२० या काळात ‘इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट २०२०’ अंतर्गत पाहाणी केली. दहा वर्षांपासून व्यवस्थापन क्षेत्रात संशोधन करीत असलेल्या राजेश पिलानिया यांनी हा अभ्यास केला. त्यामध्ये देशभरात ३४ शहरांची निवड करून सुमारे १३ हजार लोकांचा सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये महाराष्ट्रात पुण्याला सर्वाधिक पसंती दिली. याशिवाय लुधियाना, अहमदाबाद आणि चंदीगड याने प्रथम तीन क्रमांकात स्थान मिळविले तर दुसऱ्या स्तरावरील शहरांमध्ये अहमदाबाद, हैदराबाद आणि नवी दिल्ली सर्वात आनंदी शहरे बनली. त्याचप्रमाणे लुधियाना, चंदीगड आणि सूरत यांनाही द्विस्तरीय शहरांच्या निर्देशांकात स्थान मिळविले.
‘सर्वात आनंदी शहर’ पुण्याची नवी ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:32 IST