शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक बाप्पांसाठी नवीन मिश्रण; अभिजित धोंडफळे पेटंट मिळविणारे ठरले पहिले शिल्पकार

By नम्रता फडणीस | Updated: August 17, 2023 18:00 IST

या मिश्रणाला त्यांनी वडिलांचे नाव दिले आहे, ‘रविंद्र मिश्रण’...

पुणे : पीओपीच्या मूर्तीचा वापर टाळण्यासाठी आणि शाडू मातीच्या मूर्तीपेक्षाही वजनाला हलकी असणारी मूर्ती साकारण्यासाठी शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी एक नवीन मिश्रण तयार केले आहे. या मिश्रणाला त्यांनी वडिलांचे नाव दिले आहे, ‘रविंद्र मिश्रण’. त्यांना या मिश्रणाचे पेटंट मिळाले असून, अशा पद्धतीचे पेटंट मिळविणारे ते पहिले शिल्पकार ठरले आहेत.

त्यांनी हे पेटंट देशाला अर्पण केले आहे. दरवर्षी गणेशोत्सवात भाविकांना मूर्ती कोणती घ्यायची असा प्रश्न पडतो.शाडूची मूर्ती वजनाला जड असते तर पीओपीच्या मूर्तींवर रासायनिक प्रक्रिया केली असल्याने त्यांचे विसर्जन होणे सहज शक्य नसते. पण आता या मिश्रणातून साकार झालेल्या ‘गणेशमूर्ती’ ख-या अर्थाने 'इको फ्रेंडली' ठरणार असल्याची माहिती शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गौरी भावे उपस्थित होत्या.

ते म्हणाले, आजोबांनी केलेला पांगुळ अळीचा गणपती पर्यावरण पूरक पेपर पल्पपासून 1955 मध्ये केलेली मूर्ती अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. वडील रविंद्र यांचेही पर्यावरणपूरक कागदी पल्पचे अनेक गणपती पुण्यात आणिपुण्याबाहेर गेले आहेत. यातूनच प्रेरणा घेत मी एका नवीन मिश्रणाच्या अभ्यासास सुरुवात केली. या मिश्रणावर अनेक प्रयोग केले गेले. सिव्हिल इंजिनिअर यांच्या टेस्टिंग लँबमध्ये कठीण चाचण्या करण्यात आल्या. अनेक माध्यमे हाताळल्यानंतर अनेक प्रयोगांच्या अंतिम 2019 मध्ये मिश्रणास यश मिळाले. जुलै 2019 मध्ये पेटंटसाठी नोंदणी केली आणि 2023 मध्ये पेटंट मिळाले.

या मिश्रणात या घटकांचा केला वापर

  • गाळाची माती
  • शाडू माती
  • भाताचे मऊ तूस किंवा लाकडाचा बारीक भुसा

 

मिश्रणाची वैशिष्ट्ये-

हे मिश्रण पूर्णत: रसायन आणि रासायनिक क्रिया विरहित असल्याने विसर्जन केल्यानंतर ते झाडांना व कुड्यांमध्ये वापरु शकतो. या मिश्रणापासून साकार झालेल्या मूर्ती शाडूच्या तुलनेत हलक्या आहेत. शाडू मातीच्या मूर्तीपेक्षा ही मूर्ती लवकर सुकते. तसेच यावर इतर माध्यमांप्रमाणेच रंगकामही करता येते.

टॅग्स :PuneपुणेganpatiगणपतीGanpati Festivalगणेशोत्सव