शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

गैरप्रकारांचे महापरीक्षा पोर्टल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 07:02 IST

महापरीक्षा मंडळ बरखास्त करून नोकरभरतीची जबाबदारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

पुणे : राज्य शासनाने सर्व गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील पदांच्या भरतीची प्रक्रिया राबविणाऱ्या महापरीक्षा पोर्टलच्या गैरकारभारामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. भरती परीक्षेदरम्यान होणारा ढिसाळपणा, मास कॉपीचे प्रकार, डमी विद्यार्थी परीक्षेला बसणे आदी असंख्य गैरप्रकार घडत आहेत. त्यामुळे महापरीक्षा मंडळ बरखास्त करून नोकरभरतीची जबाबदारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.माहिती तंत्रशिक्षण विभागाकडून सुरू करण्यात ‘महापरीक्षा’ या वेबपोर्टलच्या माध्यमातून गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील पदे भरणे १ आॅक्टोबर २०१७ पासून बंधनकारक करण्यात आले आहे. महापरीक्षा पोर्टलकडून घेतल्या जाणाºया आॅनलाइन व आॅफलाइन परीक्षांच्या गैरकारभारामुळे विद्यार्थ्यांचा त्यावरील विश्वास उडाला आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांनी विविध मागण्यासांठी पुणे ते मुंबई असा लाँग मार्च काढला आहे. त्यामध्ये महापरीक्षा हे पोर्टल तातडीने बंद करण्यत यावे, अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.महापरीक्षा पोर्टलच्या वतीने घेण्यात येणाºया परीक्षांची काही केंद्रे ्रखासगी कॉम्प्युटर सेंटरलाही देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक दिला असला तरी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात कुठेही बसून लॉगइन करण्याची परवानगी दिली जाते. त्यामध्ये विद्यार्थी शेजारी शेजारी बसून एकमेकांचे पाहून परीक्षा देत आहेत. त्यातून मास कॉपीचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. अनेक केंद्रांवर विद्यार्थ्यांची तपासणीच करण्यात येत नाही. त्यामुळे विद्यार्थी मोबाइल, इलेक्ट्रॉनिक गॅझेट सोबत घेऊन परीक्षा देत आहेत. परीक्षा केंद्रांवर अनेकदा नेटवर्कच्या समस्येमुळे परीक्षेचे वेळापत्रक कोलमडते. कॉम्प्युटर अचानक बंद होतात, परीक्षेचा वेळ संपण्यापूर्वीच कॉम्प्युटर बंद होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नाहक नुकसान होत आहे. महाविद्यालयांमध्ये बीए, बीकॉमच्या पहिल्या, दुसºया वर्षाला शिकत असलेले विद्यार्थी या परीक्षांसाठी पर्यवेक्षक म्हणून येतात, त्यामुळे अनेकदा या पर्यवेक्षकांना परीक्षार्थी जुमानत नसल्याचे दिसून येते.महाराष्टÑ नगर परिषद सेवा, नगररचना विभाग, बांधकाम विभाग, न्यायवैद्यक प्रयोगशाळा आदी ठिकाणच्या विविध पदांसाठी महापरीक्षा पोर्टलकडून परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षांसाठी अत्यंत सोपे प्रश्न विचारण्यात येत आहेत. परीक्षेची काठिण्यपातळीच कमी ठेवल्याने परीक्षेचा दर्जा घसरत चालला आहे. सध्या नोकरी मिळविण्यासाठी तीव्र स्पर्धांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे, त्याचवेळी शासनाच्या नोकरभरतीमध्ये ढिसाळपणामुळे होऊ लागल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.पोर्टलवर विद्यार्थ्यांचे आक्षेप१. खासगी कॉम्प्युटर सेंटरमध्ये परीक्षा केंद्र२. बीए, बीकॉमला शिकणारे विद्यार्थी असतात पर्यवेक्षक३. डमी उमेदवार परीक्षेला बसल्याचे प्रकार उजेडात४. परीक्षार्थी शेजारी-शेजारी बसून करतात मास कॉपी५. तपासणीच होत नसल्याने मोबाइल, इलेक्ट्रॉनिक गॅझेट सोबत नेले जातात६. नेटवर्क समस्येमुळे कॉम्प्युटर अचानक बंद पडतात७. वेळापत्रकानुसार होत नाही परीक्षामहापरीक्षा पोर्टलकडून नोकरभरती व इतर शैक्षणिक कारणांसाठी घेण्यात आलेल्या बहुतांश परीक्षा गैरप्रकारांमुळे वादग्रस्त ठरल्या आहेत. महापोर्टलने कृषीसेवक पदाच्या ९०३ जागांसाठी घेतलेल्या परीक्षेत अनेक गैरप्रकार झाल्याचे उजेडात आले. त्यांनी नुकत्याच घेण्यात आलेल्या शिक्षकांच्या अभियोग्यता परीक्षेतील काही उमेदवारांचे गुण निकालानंतर वाढविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून घेतली जाणारी परीक्षा अत्यंत सदोष आहे. त्यामुळे महापरीक्षा म्हणजेच गैरप्रकार अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.- गणेश दराडे, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा विद्यार्थी

टॅग्स :examपरीक्षा