शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

बालसाहित्याकडे गांभीर्याने पाहाण्याची गरज : डॉ. सदानंद मोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 19:08 IST

बालसाहित्य हा एक अवघड लेखन प्रकार

ठळक मुद्देबालसाहित्यिकार स्वाती राजे लिखित ‘अंधाराचं गाव’,‘पूल’ आणि ‘शोध’ या कथांच्या पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : बालसाहित्य लिहिणारे फार कमी लेखक आहेत. कारण बालसाहित्य हा एक अवघड लेखन प्रकार आहे. लहान मुलांसाठी लिहिताना काल्पनिकतेबरोबरच वास्तवाचे देखील भान असावे लागते. बालसाहित्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून, आपणही लहान होतो. हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, असे मत राज्याच्या साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.रोहन प्रकाशनातर्फे आयोजित कार्यक्रमात बालसाहित्यिकार स्वाती राजे लिखित ‘अंधाराचं गाव’,‘पूल’ आणि ‘शोध’ या कथांच्या पुस्तकांचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  स्वाती राजे, चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी, ‘किशोर’ नियतकालिकाचे संपादक किरण केंद्रे, छात्र प्रबोधनचे महेंद्र सेठिया, रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर आणि रोहन चंपानेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ.  मोरे म्हणाले, बालसाहित्याला स्वाती राजे यांनी नेहमी केंद्र्रस्थानावर ठेवले आहे. त्यांनी सहज आणि सोप्या पद्धतीत बालसाहित्याचे लेखन केले आहे. आपण सगळ्यांनीच बालसाहित्य आणि भाषा धोरणाकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे.  किरण केंद्रे्रे  यांनी बालवयातच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याची गरज आहे. बालसाहित्यात सातत्याने प्रयोग व्हायला हवेत. लेखक कितीही मोठा असला तरी त्याने मुलांसाठी लिहिताना नेहमी बालवयात शिरूनच लेखन केल पाहिजे, असे सांगितले.स्वाती राजे म्हणाल्या, जगभरात भटकंती करत असताना जे साहित्य दिसले ते आपल्याकडे का नाही, याची सातत्याने खंत वाटते. आपल्या समाजातून बालसाहित्यकार म्हणून एक पिढी पुढे आली का? असा प्रश्नही पडतो. बालसाहित्याचा फारसा गांभीर्याने अभ्यास झालेला नाही. याविषयी केवळ खंत व्यक्त न करता नवे प्रयोग बालसाहित्यात आणण्याचा प्रयत्न मी करते आहे. यावेळी स्वाती राजे यांनी आपल्या ‘पूल’ या पुस्तकाचे वाचन केले.छायाचित्र ओळी - बालसाहित्यिका स्वाती राजे लिखित पुस्तकांच्या प्रकाशनाप्रसंगी डॉ. सदानंग मोरे, (डावीकडून) चंद्रमोहन कुलकर्णी, रोहन चंपानेरकर, किरण केंद्रे, डॉ. मोरे, महेंद्र सेठिया, स्वाती राजे आणि राजेश भावसार. 

टॅग्स :PuneपुणेSadanand Moreसदानंद मोरेliteratureसाहित्य