शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अवकाश मोहिमांसाठी कुशल मनुष्यबळाची गरज- कस्तुरीरंगन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 03:06 IST

अवकाश विज्ञान परिषदेचे उद्घाटन

पुणे : पायभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही भारत प्रगती करत आहे; मात्र भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी सक्षम मनुष्यबळाची सध्या नितांत गरज आहे. त्यासाठी देशातील विद्यापीठांमध्ये भरीव कार्य करण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठांनी संशोधन संस्थांशी करार करून संशोधन संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष व वरिष्ठ सल्लागार डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी मंगळवारी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आयोजित ‘अवकाश विज्ञान’ (स्पेस सायन्सेस) या विषयातील तीनदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन, वैज्ञानिक सल्लागार डॉ. जॉर्ज जोसेफ, उपग्रह कार्यक्रमाचे संचालक डॉ. शिवकुमार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ‘आयुका’चे संचालक डॉ. सौमेक रॉयचौधरी, ‘नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अस्ट्रोफिजिक्स’चे संचालक डॉ. यशवंत गुप्ता, स्थानिक समन्वयक डॉ. पी. प्रदीप कुमार आदी उपस्थित होते. डॉ. कस्तुरीरंगन म्हणाले की, अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारत झपाट्याने प्रगती करत आहे. पायाभूत सुविधा देशात उपलब्ध आहेत. सध्या विविध महत्त्वाचे मिशन हाती घेण्यात आले आहेत आणि ती कमी वेळात पूर्ण करण्याचे आव्हान आहे. पूर्वी एखाद्या मिशनचे पाच-पाच वर्षांचे नियोजन असायचे, ते आता केवळ दोन-तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट घेतले जाते. त्यासाठी आता विद्यापीठांना मोठ्या प्रमाणात जोडून घ्यावे लागेल. या प्रकारच्या गुंतवणुकीत पुरेशी वाढ करण्याची गरज आहे.डॉ. सिवन यांनीही कुशल मनुष्यबळाची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले की, भारताचा २०२५ पर्यंतचा काळ महत्त्वाच्या अवकाश मोहिमांचा असणार आहे. चांद्रयान मोहिमेबरोबरच सूर्यवलयाचा अभ्यास करणारे ‘आदित्य मिशन’, मंगळयान-२, २०२३ साली शुक्र ग्रहाबाबत ‘व्हीनस मिशन’, सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणाचा संशोधन करणारे ‘गगनयान’, एटमॉस्फेरित सायन्सेसच्या (वातावरणीय शास्त्र) अनुशंगाने ‘दिशा १’ व ‘दिशा २’ अशा विविध मोहिमा नियोजित आहेत. त्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी आतापासून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्याची गरज आहे.सहा ‘स्पेस-टेक्नॉलॉजी इनक्युबेशन’ केंद्रदेशभरातील विद्यापीठे व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यात ‘इस्रो’कडून सहा ‘स्पेस-टेक्नॉलॉजी इनक्युबेशन’ केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याद्वारे अवकाश विज्ञानात संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना भक्कम पाठबळ व मार्गदर्शन दिले जाईल. आगरतळा येथील नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी आणि जालंधर येथे प्रत्येकी एक केंद्र निश्चित करण्यात आले आहे. उर्वरित केंद्रही लवकरच सुरू केली जातील, असे डॉ. सिवन यांनी सांगितले.

टॅग्स :isroइस्रोtechnologyतंत्रज्ञान