शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

कोरोनाच्या संकटाशी लढताना स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतीकारकांची मानसिकता अंगीकारण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 16:14 IST

जुलमी राजवटीतुन भारत देशाला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी अनेक यातना निमूटपणे सहन केल्या..

ठळक मुद्देहुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त राजगुरुनगर येथे अभिवादन कार्यक्रम

राजगुरुनगर: देशाच्या स्वातंत्र्य लढयात इंग्रजांशी कडवा संघर्ष करताना क्रांतिकारकांनी स्वत:वर अत्यंत कठोर नियम लादून घेतले होते. त्यांच्या योगदानातुन आणि बलिदानातुन देशाला स्वातंत्र्य मिळाले. सध्याच्या कोरोनाच्या जागतिक संकटाला सामोरे जाताना स्वातंत्रपूर्व काळातील क्रांतीकारकांची ही मानसिकता अंगीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार तथा शिवसेनेचे उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य क्रांतिवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त राजगुरुनगर येथे सोमवारी (दि २४) अभिवादन कार्यक्रम झाला. राजगुरुनगर बस स्थानक आवारातील हुतात्मा राजगुरू,भगतसिंग व सुखदेव यांच्या स्मृती शिल्पाना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यावर आढळराव पाटील बोलत होते. अभिवादन कार्यक्रमात प्रांताधिकारी संजय तेली,तहसीलदार सुचित्रा आमले,खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टे पाटील,सेनेच्या विजया शिंदे, मुकुंद आवटे,कोंडीभाऊ टाकळकर आदी उपस्थित होते. हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थान असलेल्या राजगुरू वाड्यावर अभिवादन कार्यक्रम झाला.खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश गुरव यांच्या हस्ते वाड्यावर ध्वजारोहण करण्यात आले.हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे सुशील मांजरे,संदीप वाळुंज,शैलेश रावळ,विठ्ठल पाचारणे,अमित टाकळकर यावेळी उपस्थित होते.

आढळराव पाटील म्हणाले, जुलमी राजवटीतुन भारत देशाला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी अनेक यातना निमूटपणे सहन केल्या. आजच्या संकट काळात या योगदानाचे स्मरण करा आणि स्वत:सह समाजाचे हित जोपासण्याचे ध्येय निश्चित करा असे आवाहन माजी खासदार तथा शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.

 

टॅग्स :Khedखेडcorona virusकोरोना वायरस बातम्याShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळराव