शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मातोश्री वृद्धाश्रमांचे आधुनिकीकरण करण्याची आवश्यकता, मधुरभाव वृद्धाश्रम एक उत्कृष्ट व्यवस्थापन - नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 19:25 IST

‘समाजात ज्येष्ठांना सन्मानाची आणि आपुलकीची वागणूक मिळण्याकरिता शिवसेनेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मातोश्री वृद्धाश्रमांचे आधुनिकीकरण करण्याची आवश्यकता आहे. या क्षेत्रात मधुरभाव वृद्धाश्रम करीत असलेले कार्य खरोखरीच कौतुकास्पद आहे,  असे प्रतिपादन आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी केले.

पुणे, दि. 31 - ‘समाजात ज्येष्ठांना सन्मानाची आणि आपुलकीची वागणूक मिळण्याकरिता शिवसेनेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मातोश्री वृद्धाश्रमांचे आधुनिकीकरण करण्याची आवश्यकता आहे. या क्षेत्रात मधुरभाव वृद्धाश्रम करीत असलेले कार्य खरोखरीच कौतुकास्पद आहे,  असे प्रतिपादन आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी केले. पुणे परिसरातील पिंपळे निलख भागात सामाजिक कार्यकर्त्या अंजली देशपांडे यांच्या मधुरभाव ज्येष्ठ नागरिक केंद्राला आज त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी त्या बोलत होत्या.डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेनेच्या वतीने हिंदुह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या मातोश्री वृध्दाश्रमामुळे अनेक ज्येष्ठांना एक भक्कम आधार प्राप्त झाला. या योजनेची लोकप्रियता अजूनही आहे. या अंतर्गत सुरु झालेल्या अनेक ठिकाणी आता आधुनिक सोयी सुविधा देण्याची आवश्यकता आहे.’ त्यांनी आज ठिकाणी भेट देऊन येथे राहत असलेल्या ज्येष्ठांशी त्यांनी संवाद साधला. या सर्व ज्येष्ठांनी शिवसेनेच्या आणि बाळासाहेबांची भेट झाल्याच्या हृद्य आठवणी जाग्या केल्या. शिवसेनेच्या जुन्या काळातील चळवळी, आंदोलने याचेही स्मरण करून दिले. इथे राहत असलेले सर्व ज्येष्ठ नागरिक हे विविध सरकारी विभागांमध्ये मोठ्या हुद्द्यांवर काम केलेले असून उच्चशिक्षित आहेत. त्यातील काहीजण अल्झायमर सारख्या आजारांनी त्रस्त असूनही केंद्रात त्यांची उत्तम व्यवस्था व काळजी घेतली जात असल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले.डॉ. गोऱ्हे यांनी येथे असलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, नगरसेविकाआरती चोंधे उपस्थित होत्या. श्रीमती देशपांडे यांनी केंद्राची माहिती दिली. या प्रकारच्या केंद्रांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात अशी मागणी देशपांडे यांनी यावेळी केली.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना