पुणो : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) प्रशिक्षणार्थी जवानाने ‘रॅगिंग’च्या प्रकाराला कंटाळून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत. मूळच्या भुतानच्या या जवानाने गुरुवारी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
येशी दोरजी (वय 18) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. दोरजी याचा मृतदेह गुरुवारी खोलीमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्याला तातडीने लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याला उपचारांपूर्वीच मृत घोषित करण्यात आले होते. या आत्महत्येच्या तपासासाठी समिती स्थापन करण्यात आल्याचे विंग कमांडर संदीप छेत्री यांनी सांगितले होते. दोरजीचा मृतदेह त्याच्या नातेवाइकांकडे सोपवण्यात आला आहे. दोरजीच्या आत्महत्येमागे घरापासून लांब राहावे लागत असल्यामुळे आलेली निराशा, हे एक कारण असू शकते. तसेच, रॅगिंगमधूनही त्याने आत्महत्या केल्याची शक्यता गृहीत धरून पोलीस तपास करीत आहेत. एनडीएच्या सूत्रंनुसार, 3 महिन्यांर्पयत एनडीमध्ये राहिलेल्या दोरजीला रॅगिंगद्वारे त्रस देण्यात येत होता.
एनडीएमध्ये भारताच्या मित्रराष्ट्रांच्या तरुणांना लष्करी प्रशिक्षण देण्यात येते. यांमध्ये भूतान, नेपाळ, मालदीव, कझाकिस्तान, अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. परंतु, आजवर या देशांच्या कोणत्याही प्रशिक्षणार्थीने आत्महत्या केलेली नव्हती. एनडीमध्ये 18 स्क्वार्डन आहेत. प्रत्येक स्क्वार्डनमध्ये 3 विभाग आहेत. एनडीएचे माजी प्रशिक्षक कर्नल (निवृत्त) विनय दळवी यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. या घटनेमागील कारणांचा शोध घेऊन त्याचा तपास करण्यात यावा, अशी मागणी दळवी यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
4यापूर्वीही छात्रंनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता.
4रॅगिंगच्या प्रकार प्रथमच समोर येत असल्याने सखोल चौकशी