पिंपरी : पंचवीस वर्षे सत्ता असताना राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:ची घरे भरण्याचे काम केले. या कालावधीत हजारो कोटी खर्च करूनदेखील पुरेशा प्रमाणात शहराचा विकास झाला नाही, अशी टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी निगडी येथे केली.निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांचा शपथ ग्रहण कार्यक्रम बुधवारी सकाळी अकराला निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्पासमोर संपन्न झाला. या वेळी संघटन मंत्री रवी अनासपुरे, भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, राज्यलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, आमदार महेश लांडगे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, भाजपा प्रदेश सचिव उमा खापरे, भाजपा प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, एकनाथ पवार, महिला मोर्चा शहराध्यक्षा शैला मोळक, युवा मोर्चा शहराध्यक्ष रवी लांडगे आदी उपस्थित होते. या वेळी संत तुकाराम महाराज देवस्थानचे विश्वस्त हभप संभाजीमहाराज मोरे, हभप किसनमहाराज चौधरी, हाफीजसाहब जैनुद्दीन यांनी उमेदवारांना शपथ दिली.(प्रतिनिधी)
राष्ट्रवादीने भरली स्वत:ची घरे
By admin | Updated: February 9, 2017 03:28 IST