शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
9
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
10
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
11
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
12
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
13
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
14
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
15
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
16
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
17
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
18
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
19
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
20
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गळती सुरूच

By admin | Updated: May 24, 2016 05:53 IST

भारतीय जनता पक्षाने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोहरे फोडण्यास सुरुवात केली आहे. माजी उपमहापौर व राष्ट्रवादीचे भोसरी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शरद बोऱ्हाडे

पिंपरी : भारतीय जनता पक्षाने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोहरे फोडण्यास सुरुवात केली आहे. माजी उपमहापौर व राष्ट्रवादीचे भोसरी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शरद बोऱ्हाडे आणि राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष भरत लांडगे हे भाजपात दाखल झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीला पहिला सुरुंग लावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रलंबित प्रश्नांसंदर्भात पुण्यात बैठक घेतली होती. त्या वेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, माजी उपसभापती सविता खुळे, पीसीएमटीचे माजी अध्यक्ष व काँग्रेसच्या नगरसेविका आरती चोंधे यांचे पती सुरेश चोंधे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, माजी नगरसेवक व राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका माया बारणे यांचे पती संतोष बारणे, विद्यमान नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या पत्नी ममता गायकवाड, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष हरेष तापकीर, राम वाकडकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे विद्यमान सदस्यही भाजपाने आपल्या गोटात दाखल करून घेतले आहेत. मात्र, सरळसरळ प्रवेश करूनही राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने जाहीरपणे वक्तव्य केलेले नाही. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्ननिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला दोनदा शह देण्याचा प्रयत्न केला आहे. माजी आमदार विलास लांडे यांचे कट्टर समर्थक व माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष भरत लांडगे यांना भाजपात घेतले आहे. मुंबईतील भाजपाच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. या वेळी शहराध्यक्ष, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार उपस्थित होते.

यानंतर कोणचा नंबर लागणार?राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोहरे फोडण्याच्या दृष्टीने भाजपाने प्रयत्न सुरू केले आहेत. चिंचवडमधील काही जणांनी दहा दिवसांपूर्वी प्रवेश केला. भोसरी विधानसभेतील दोन पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. पिंपरीतील कोण भाजपात जाणार, याबाबत चर्चा रंगली आहे. अनेक दिग्गज भाजपामध्ये प्रवेश करतील असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.