शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

दुचाकीची अंत्ययात्रा काढून राष्ट्रवादीचे पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 2:53 PM

दुचाकीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा व अच्छे दिनाचा फुसका बार, पेट्रोल गेले ८३ रुपयांवर अशी घोषणाबाजी करत भाजपा सरकारचा आंदोलकांनी जोरदार निषेध नोंदविला.

ठळक मुद्देभाजपाच्या राजवटीत जनतेला सर्वाधिक महाग पेट्रोल खरेदी

पिंपरी : शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात चिंचवडगावातून दुचाकीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. अंत्ययात्रेत टाळ मृदंगाचा गजर करण्यात आला. राम नाम सत्य है, मोदी सरकार भ्रष्ट है, अच्छे दिनाचा फुसका बार, पेट्रोल गेले ८३ रूपयावर अशी घोषणाबाजी करीत भाजपा सरकारचा  आंदोलकांनी जोरदार निषेध नोंदविला.चिंचवड, लिंकरस्ता येथील कालिका माता मंदिरापासून आंदोलनास सुरूवात झाली. गावडे पेट्रोल पंप, चापेकर चौक मार्गे मोरया गोसावी मंदिरापर्यंत ही अंत्ययात्रा काढण्यात आली. तेथे जाहीर सभेने आंदोलनाचा समारोप झाला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनात महिला शहराध्यक्ष व नगरसेविका वैशाली काळभोर, माजी महापौर व नगरसेविका अपर्णा डोके, प्रवक्ते फजल शेख, विद्यार्थी शहराध्यक्ष सुनील गव्हाणे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, माजी नगरसेवक निलेश पांढारकर, निलेश डोके, राजेंद्र साळुंखे,आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना वाकडकर म्हणाले, पेट्रोल, डिझेलच्या दरात सरकारने भरमसाठ वाढ केली आहे. पेट्रोल ८३ रुपये लिटर झाले आहे. भाजपाच्या राजवटीत जनतेला सर्वाधिक महाग पेट्रोल खरेदी करावे लागत आहे. भाजपाने निवडणुकीत केवळ अच्छे दिनाचे आभासी स्वप्न दाखविले, नागरिकांचे मात्र हाल सुरू आहेत. घरगुती गॅसच्या दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPetrolपेट्रोलDieselडिझेलNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी