पिंपरी : शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात चिंचवडगावातून दुचाकीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. अंत्ययात्रेत टाळ मृदंगाचा गजर करण्यात आला. राम नाम सत्य है, मोदी सरकार भ्रष्ट है, अच्छे दिनाचा फुसका बार, पेट्रोल गेले ८३ रूपयावर अशी घोषणाबाजी करीत भाजपा सरकारचा आंदोलकांनी जोरदार निषेध नोंदविला.चिंचवड, लिंकरस्ता येथील कालिका माता मंदिरापासून आंदोलनास सुरूवात झाली. गावडे पेट्रोल पंप, चापेकर चौक मार्गे मोरया गोसावी मंदिरापर्यंत ही अंत्ययात्रा काढण्यात आली. तेथे जाहीर सभेने आंदोलनाचा समारोप झाला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनात महिला शहराध्यक्ष व नगरसेविका वैशाली काळभोर, माजी महापौर व नगरसेविका अपर्णा डोके, प्रवक्ते फजल शेख, विद्यार्थी शहराध्यक्ष सुनील गव्हाणे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, माजी नगरसेवक निलेश पांढारकर, निलेश डोके, राजेंद्र साळुंखे,आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दुचाकीची अंत्ययात्रा काढून राष्ट्रवादीचे पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 14:53 IST
दुचाकीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा व अच्छे दिनाचा फुसका बार, पेट्रोल गेले ८३ रुपयांवर अशी घोषणाबाजी करत भाजपा सरकारचा आंदोलकांनी जोरदार निषेध नोंदविला.
दुचाकीची अंत्ययात्रा काढून राष्ट्रवादीचे पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन
ठळक मुद्देभाजपाच्या राजवटीत जनतेला सर्वाधिक महाग पेट्रोल खरेदी