शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी, आपला माणूसचा शिवसेनेला दे धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 02:39 IST

नगरपालिकेच्या सन २०१९ च्या विषय समित्यांच्या निवडणुकीत विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपला माणूस आपली आघाडीने एकूण ५ पैकी ४ समित्यांचे सभापतिपद पटकावीत सत्ताधारी शिवसेनेला जोरदार धक्का दिला.

जुन्नर : नगरपालिकेच्या सन २०१९ च्या विषय समित्यांच्या निवडणुकीत विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपला माणूस आपली आघाडीने एकूण ५ पैकी ४ समित्यांचे सभापतिपद पटकावीत सत्ताधारी शिवसेनेला जोरदार धक्का दिला. शिवसेनेला केवळ एका समितीच्या सभापतिपदावर समाधान मानावे लागले. गेल्यावर्षी विषय समिती निवडणुकीत शिवसेना व आघाडीला प्रत्येकी २ सभापतिपद मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसला १ सभापतिपद मिळाले होते. मात्र, यावेळी राष्ट्रवादी व आघाडीत समझोता एकत्रित झाल्याने त्याचा फटका शिवसेनेला बसला. परिणामी अवघ्या एका सभापतिपदावर शिवसेनेला समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेविकेने पक्षाने बजाविलेला आदेश डावलून शिवसेनेच्या एका नगरसेविकेच्या सभापतिपदाच्या अर्जावर अनुमोदक म्हणून सही केल्याने तसेच मतदान केल्याने ती समिती शिवसेनेच्या ताब्यात गेली. अन्यथा शिवसेनेला पुरते धोबीपछाड देण्यात आम्ही यशस्वी झालो असतो, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे यांनी केला. विषय समितीची निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी कामकाज पाहिले.नगरपालिका सभागृहात शिवसेनेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष जरी असले तरी नगरसेवकांचे संख्याबळ ५ असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व आपला माणूस आपली आघाडी यांची दिलजमाई झाल्याने शिवसेनेला विषय समिती निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका समीना शेख यांचे नगरसेवकपद रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अपील दाखल केले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते व प्रतोद दिनेश दुबे यांनी सांगितले. नगरसेविकेला विहित वेळेत पक्षादेश बजाविला होता. तसेच नगरसेविका जरी समीना शेख असल्या तरी सर्व कामकाजामध्ये त्यांचे पती ढवळाढवळ करतात व सर्व काम डमी नगरसेवक म्हणून तेच पाहत असतात. पक्षाशी गद्दारी करणाऱ्या नगरसेविकेला नगरपालिकेतून घरची वाट दाखविणार, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे यांनी निवेदनाद्वारे केला आहे.>१ आरोग्य, क्रीडा व वृक्षसंवर्धन समिती- सभापती- जमीर खान कागदी, सदस्य- अंकिता गोसावी, अविन फुलपगार, सय्यद अब्दुल माजिद, फिरोज पठाण.२ पाणीपुरवठा समिती- सभापती- दिनेश दुबे, सदस्य- समीर भगत, दीपेश परदेशी, फिरोज पठाण, हाजरा इनामदार३ वीज समिती- सभापती- अलका फुलपगार, सदस्य- दीपेश परदेशी, वैभव मलठणकर, अश्विनी गवळी, कविता गुंजाळ.४ बांधकाम समिती- सभापती-लक्ष्मीकांत कुंभार, सदस्य- वैभव मलठणकर, समीर भगत, अक्षय मांडवे, हाजरा इनामदार.५ महिला व बालकल्याण समिती - सभापती- सुवर्णा बनकर, सदस्य- अंकिता गोसावी, समीना शेख, अक्षय मांडवे, सना मन्सुरी.