शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी- भाजपामध्ये रंगतदार सामना

By admin | Updated: November 17, 2016 04:17 IST

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाले तांबे, नगरसेविका मोहिनी देवकर असे दोन विद्यमान नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा परंपरागत मतदार असलेला भाग, तसेच

 धनकवडी : स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाले तांबे, नगरसेविका मोहिनी देवकर असे दोन विद्यमान नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा परंपरागत मतदार असलेला भाग, तसेच आमदार भीमराव तापकीर, नगरसेविका वर्षा तापकीर यांचा असलेला जनसंपर्क प्रभाग ३९ मध्ये आहे. त्यामुळे प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपामध्ये थेट लढत होण्याची शक्यता या प्रभागात दिसून येणार आहे. त्याचबरोबर काँग्रेस, मनसे, शिवसेना या पक्षांकडूनही जोरदार संघटन बांधणी होताना दिसून येते. प्रभाग क्रमांक ७४, तसेच प्रभाग ६९ व ७५ चा काही भाग समाविष्ट करून नवीन प्रभागरचनेत ३९ हा प्रभाग तयार करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे गेल्या दहा वर्षांपासून या प्रभागातून निवडून येत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नगरसेविका मोहिनी देवकर, भाजपाच्या वर्षा तापकीर या विद्यमान नगरसेविका या प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शिवलाल भोसले, काँग्रेसचे नगरसेवक अभिजित कदम, शिवसेनेच्या कल्पना थोरवे यांच्या प्रभागातील काही भाग या नव्या प्रभागात समाविष्ट झाला आहे. मात्र, ते दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. सोसायट्या, बंगलो, गावठाण, झोपडपट्टी, वस्ती भाग असा दाट लोकवस्ती असलेला हा संमिश्र प्रभाग आहे. राष्ट्रवादीचा परंपरागत मतदार या भागात मोठ्या संख्येने आहे. त्याचबरोबर लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवारांनी या भागातून चांगली मते घेतलेली आहे. प्रभागात पाच वर्षांत केलेली विकासकामे व मतदारांशी असलेला जनसंपर्क आदी बाबी निवडणुकीमध्ये महत्त्वाच्या ठरणार आहेत. गणेश मंडळे, नातीगोती, मित्र परिवार आदींवर उमेदवारांकडून भर दिला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याकडे लक्ष दिले जात आहे. भाजपाच्या नगरसेविका वर्षा तापकीर यांच्यासह सरला माने, दीपक माने, नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेले गणेश भिंताडे यांच्याकडून पक्षाच्या संघटनात्मक कामावर भर दिला जात आहे.मनसेच्या उमेदवार अश्विनी भागवत यांचा मागील वेळेस थोडया मतांनी पराभव झाला होता. त्याचबरोबर मनसेच्या चंद्रकांत गोगावले यांनीदेखील चांगली मते घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशाल तांबे, बाळासाहेब धनकवडे, मोहिनी देवकर, संतोष फरांदे, किरण परदेशी, निकिता पवार, संजय पवार, गौरी जाधव, जयश्री पाटील, सुनील खेडेकर, सुवर्णा चव्हाण, किशोरी गोरे, प्रीती फरांदे, सुवर्णा चव्हाण, अर्चना लिमण इच्छुक आहेत. भाजपाकडून वर्षा तापकीर, गणेश भिंताडे, दीपक माने, सरला दीपक माने, भूपेंद्र गोसावी, अप्पा धावने, विश्वास आहेर इच्छुक आहेत. मनसेकडून चंद्रकांत गोगावले, अश्विनी भागवत, ऋषी सुतार, ज्योती कोडे, मयूर भिसे इच्छुक आहेत. शिवसेनेकडून सचिन धुमाळ, दीपक जाधव, प्रल्हाद कदम, योगेश पवार, प्रवीण खन्ना, नामदेव दामगुडे, रणजित शेलार, अनिल बटाने, किसन बोराटे, राजाभाऊ गवळी, रमेश शेलार, दत्ता घोणे, नेहा कुलकर्णी, काँग्रेसकडून दिलीप दोरगे, लता जगताप इच्छुक आहेत. त्याचबरोबर अनिल भोसले, मीना परदेशी हेदेखील इच्छुक आहेत.