शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीने स्वीकारले ईव्हीएम हॅक करण्याचे आव्हान

By admin | Updated: May 28, 2017 04:03 IST

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन हॅक करून दाखविण्याचे निवडणूक आयोगाने दिलेले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकारले आहे. मात्र त्यासाठी दिलेला चार तासांचा वेळ खूपच कमी

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन हॅक करून दाखविण्याचे निवडणूक आयोगाने दिलेले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकारले आहे. मात्र त्यासाठी दिलेला चार तासांचा वेळ खूपच कमी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़पुणे महापालिका निवडणुकीनंतर पुणे शहरात भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्षातील पराभूत उमेदवारांनी एकत्र येत ईव्हीएम मशीनविरोधात आंदोलने केली होती़ थेट राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यापर्यंत तक्रारी करण्यात आल्या होत्या़ जिल्हा न्यायालयात निवडणुकीतील निकालाविरोधात ८० हून अधिक दावे दाखल करण्यात आले आहेत़ त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्वच पक्षांना ईव्हीएम हॅक करण्याचे आव्हान दिले होते. राष्ट्रवादीच्या वतीने अ‍ॅड. वंदना चव्हाण, गौरव जाचक, यासिन शेख यांनी हे आव्हान स्वीकारले आहे.अ‍ॅड. चव्हाण म्हणाल्या, ‘चार तासांत कोणी हे मशीन हॅक करू शकत नाही. या कारणाने इतर कोणतेही पक्ष पुढे आले नाहीत. कोणी तज्ज्ञ या संदर्भात जबाबदारी घेत नसले तरी ईव्हीएम हॅक करण्याबाबत त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळणार आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ईव्हीएममध्ये फेरफार होऊ शकतो का, याची तपासणी करण्यात येणार आहे. भाजपाने ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी हा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले़