शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नाट्य परिषद अजूनही आॅफलाइन, संमेलनाध्यक्षांची नावे नाहीत आॅनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 04:02 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आजपर्यंतचे अध्यक्ष कोण ? हे जाणून घ्यायचे असेल तर गुगलवर अ.भा.साहित्य संमेलनाध्यक्षांची यादी असे टाकल्यास तारीख, वर्ष आणि नावांसह सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते.

- नम्रता फडणीसपुणे  - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आजपर्यंतचे अध्यक्ष कोण ? हे जाणून घ्यायचे असेल तर गुगलवर अ.भा.साहित्य संमेलनाध्यक्षांची यादी असे टाकल्यास तारीख, वर्ष आणि नावांसह सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. मात्र अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांबाबतची माहिती विचारल्यास ‘माहिती उपलब्ध नाही’असे सांगितले जाते. संमेलनाध्यक्षांच्या डॉक्यूमेंटेशनबाबत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आजतागायत ‘आॅफलाईन’च राहिली असल्याचे समोर आले आहे. 98 व्या वर्षात पदार्पण करणा-या नाट्यसंमेलनाचे हे एकाअर्थी दुर्दैवच म्हणावे लागेल.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नाट्य संमेलनाध्यक्षांच्या डॉक्यूमेंटेशनकडे दुर्लक्ष झाले आहे. पु.ल देशपांडे. चित्तरंजन कोल्हटकर, जयमाला शिलेदार अशा नाट्यसृष्टीतील अनेक शिलेदारांनी संमेलनाध्यक्षपद भूषविले आहे. मात्र काही निवडक नावे सोडली तर आजवर भूषविलेल्या नाट्य संमेलनाध्यक्षांबाबत नवी पिढी अजूनही अनभिज्ञच आहे. त्यांचे डॉक्यूमेंटेशन करण्याबाबत नाट्य परिषदेला अजूनही ‘मुहूर्त’ लागलेला नाही.मध्यवर्ती नाट्य परिषदेला शासनाकडून अनुदान दिले जाते. त्यातील काही निधीचा वापर हा डॉक्यूमेंटेशनसाठी करता येणे सहज शक्य आहे, अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांवरही विशेष पैसा खर्च न करता ही गोष्ट करता येऊ शकते.नाट्यप्रेमींनी पुढाकार घेण्याची गरजनाट्य संमेलनाध्यक्षांचा परिचय देणारे पुस्तक नाशिकमधल्या एका नाट्य कलाकाराने काढले आहे. मात्र आजपर्यंत संमेलनाध्यक्षांच्या डॉक्यूमेंटेशनबाबत पुढाकार घेण्यात आलेला नाही. गुगलवर ही माहिती उपलब्ध नाही. मध्यवर्ती नाट्य परिषद, नाट्यप्रेमी मंडळींनी याबाबत पुढाकार घेण्याची गरज आहे.- सुनील महाजन,अध्यक्ष कोथरूड नाट्य परिषदयापुढील काळात कशा पद्धतीने काम हळूहळू पुढे नेता येईल यासंबंधीचा विचार करण्यात येणार आहे. येत्या 13 मेला नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या पहिल्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यामध्ये नाट्य संमेलनाध्यक्षांच्या डॉक्यूमेंटेशनचा मुददा नक्कीच मांडला जाईल आणि भविष्यात ते काम नक्कीच पूर्णत्वास येईल.- दीपक रेगे, सदस्य नियामक मंडळ, अ.भा.मराठी नाट्य परिषद

टॅग्स :marathiमराठीnewsबातम्याPuneपुणे