शहरं
Join us  
Trending Stories
1
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
2
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
3
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
4
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
5
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
6
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
7
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
8
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
9
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
10
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
11
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
12
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
13
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
14
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
15
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
16
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
17
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
18
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
19
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
20
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा

नाट्य परिषद निवडणूक बिनविरोध, १५ उमेदवारांचे अर्ज मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 6:10 AM

नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमधून पुणे विभागातील २२ पैकी तब्बल १५ उमेदवारांनी गुरुवारी अर्ज मागे घेतल्याने सात जणांची परिषदेच्या नियामक मंडळावर थेट वर्णी लागली. बीड, उस्मानाबाद, नांदेड आणि नागपूरनंतर पुणे विभागाची निवडणूक बिनविरोध झाली. कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, प्रमुख कार्यवाह योगेश सोमण, पुणे शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक रेगे या दोन्ही शाखांच्या पदाधिका-यांसह चार जणांचा समावेश आहे.

पुणे : नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमधून पुणे विभागातील २२ पैकी तब्बल १५ उमेदवारांनी गुरुवारी अर्ज मागे घेतल्याने सात जणांची परिषदेच्या नियामक मंडळावर थेट वर्णी लागली. बीड, उस्मानाबाद, नांदेड आणि नागपूरनंतर पुणे विभागाची निवडणूक बिनविरोध झाली. कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, प्रमुख कार्यवाह योगेश सोमण, पुणे शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक रेगे या दोन्ही शाखांच्या पदाधिका-यांसह चार जणांचा समावेश आहे.मागच्या निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाल्यामुळे मध्यवर्ती नाट्य परिषदेकडून घटना दुरुस्ती करण्यात आली. पूर्वी पश्चिम महाराष्ट्राअंतर्गत सांगली, सातारा, कºहाड, इचलकरंजी आणि पुणे अशा विभागवार निवडणुका घेतल्या जायच्या. मात्र आता नवीन घटनेनुसार १९ जिल्ह्यांतील ज्या शाखांचे ३०० सभासद असतील त्यातला एक प्रतिनिधी परिषदेच्या नियामक मंडळावर घेतला जाणार आहे. पुणे विभागासाठी ७ जागा आहेत. त्यात पुणे, बारामती, तळेगाव, पिंपरी चिंचवड, कोथरूड आणि दौंड या ७ शाखांचा समावेश आहे. यंदा पुणे विभागातून २३ अर्ज सादर झाले होते. काही जणांनी आॅनलाईन अर्ज भरले होते. त्यातील सत्यजित धांडेकर यांचा अर्ज बाद झाला. गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानुसार २२ पैकी १५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सात जणांची नाट्य परिषदेच्या नियामक मंडळावर थेट वर्णी लागली. त्यामध्ये सुनील महाजन, योगेश सोमण, दीपक रेगे, भाऊसाहेब भोईर, राज काझी, दीपक काळे आणि सुरेश धोत्रे यांचा समावेश आहे. निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नास पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी अर्ज मागे घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला.आमच्यावर विश्वास ठेवून ज्या इतर उमेदवारांनी निवडणूकीतून माघार घेत आम्हाला पाठिंबा दिला. त्यांचे आम्ही शतश: ॠणी आहोत. जे काम करण्याची इच्छा आम्ही व्यक्त केली आहे, ते काम पाच वर्षांत आम्ही करून दाखवू.- योगेश सोमण, रंगकर्मी आणि दिग्दर्शक

टॅग्स :Puneपुणे