शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

शेतकऱ्याचा मुलगा बनला राष्ट्रीय वेटलिफ्टर

By admin | Updated: October 21, 2015 00:47 IST

तो शेतकरी कुटुंबातील... घरची परिस्थिती तशी बेताची; पण शेतीत राबताना त्या मातीनेच त्याला जगण्याचे बळ आणि आयुष्याचे ध्येय दिले आणि जिद्द, परिश्रम व चिकाटीच्या बळावर

शेळपिंपळगाव ते टोकिओ :काळ्या मातीनेच दिले जगण्याचे बळ शेलपिंपळगाव : तो शेतकरी कुटुंबातील... घरची परिस्थिती तशी बेताची; पण शेतीत राबताना त्या मातीनेच त्याला जगण्याचे बळ आणि आयुष्याचे ध्येय दिले आणि जिद्द, परिश्रम व चिकाटीच्या बळावर तो वेटलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर झळकला. इतकेच नवे त्याने भारताला रौप्यपदकही मिळवून दिले. हा जिगरबाज तरुण म्हणजे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा हर्षद सुभाष वाडेकर. नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत त्याने भारताला रौप्यपदक मिळवून दिले. त्यामुळे त्याचे नाव आता सर्वत्र झळकत आहे. त्याच्या जडणघडणीचा प्रवास आणि त्याची वाटचाल समजून घ्यावी, यासाठी त्याच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. शेलपिंपळगाव (ता. खेड) या गावात जन्मलेल्या हर्षदचे शिक्षण तिथल्याच श्री शिवाजी विद्यालयात झाले. सुरुवातीला त्याला आवड होती कबड्डीची. जिल्हास्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर तो गोळाफेकीकडे वळला. काही दिवसांतच वेटलिफ्टिंग खेळाकडे आकर्षित झाला. एकाच खेळावर लक्ष केंद्रित न करणाऱ्या हर्षदचा कान एक दिवस त्याच्या वडिलांनीच धरला. तुला आवडणाऱ्या एकाच खेळाची तू निवड कर आणि त्याच खेळावर लक्ष दे, असा सल्ला मिळाल्यानंतर हर्षदने वेटलिफ्टिंगला पसंती दिली.२०११ मध्ये वेटलिफ्टिंगच्या सरावाला कसून सुरुवात केली अन् विभागस्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धेत आपल्या खेळाची छाप पाडली. त्यानंतर दोनदा तो राज्यस्तरीय स्पर्धेत अयशस्वी ठरला. सांगलीत पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत २४६ किलो वजन उचललेल्या हर्षदची पहिल्यांदा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. हरियाणात झालेल्या स्पर्धेत हर्षदने चुणूक दाखविल्याने पतियाळा येथे सहा महिने प्रशिक्षण घेतले. बालेवाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेत ९४ किलोगटात दोन प्रकारांत एकूण ३०५ किलो वजन उचलून त्याने भारताला रौप्यपदक मिळवून दिले. खेळात प्राविण्य मिळवून देशाचे नाव उज्वल करावे, अशी आशा त्याचे वडील सरपंच सुभाष वाडेकर यांना आहे. (वार्ताहर)