पुणे : इन्सिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट्स आॅफ इंडिया पश्चिम विभाग शाखा आणि बोर्ड आॅफ स्टडीज्च्यावतीने सीए विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सीए विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, विद्यार्थ्यांचा एकमेकांशी संवाद वाढविणे तसेच संशोधन, विषयाची मांडणी कशी करावी, राष्ट्रउभारणीसाठी प्रोत्साहन आदींविषयी उद्देश समोर ठेवून परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेला ३,५०० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. कार्यक्रमास सीए रेखा धामणकर, सीए चारुहास उपासनी, सीए ऋता चितळे, सीए एस. बी. झावरे, सीए सर्वेश जोशी, हनुमंत गायकवाड, किशोर चौकर त्याचबरोबर विद्यार्थी प्रतिनिधी ज्ञानेश्वर पिंपळे, करण चंदनानी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
‘सीएं’ची राष्ट्रीय परिषद
By admin | Updated: January 24, 2017 02:25 IST