शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नाव समितीच्या अडचणींत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 02:27 IST

प्रस्ताव पक्षनेत्यांकडे : धोरणामुळे राजकीय दबाव

पुणे : महापालिकेच्या नाव समितीसमोरच्या अडचणींमध्ये वाढच होत चालली आहे. नामकरणाचे काही ठराव समितीसमोर आले असून त्याबाबतचे महापालिकेचे धोरण व प्रत्यक्षात नगरसेवकांची मागणी यात तफावत आहे. त्यातून राजकीय दबाव वाढत असल्याने यावर निर्णय घेण्यासाठी पक्षनेत्यांच्या समितीकडे संबधित ठराव पाठवून देण्यात आले आहेत.

महापालिकेच्या कोणत्याही विकासकामाला नाव द्यायचे असल्यास त्यासाठी पक्षनेत्यांनी धोरण ठरवून घेतले आहे. एका प्रभागात ४ नगरसेवक आहेत. त्यापैकी तिघांची संमती असेल तेच नाव अंतीम करण्यात येईल असे धोरण पक्षनेत्यांनी त्यांच्या संयुक्त बैठकीत ठरवले आहे. सर्वपक्षीय गटनेते या बैठकीला उपस्थित असतात व तेच सर्वसंमतीने धोरण ठरवतात. तीन जणांचे मत व तेच नाव असे धोरण मंजूर झालेले धोरण आहे. मात्र काही प्रभागांमध्ये याबाबत अडचण निर्माण झाली आहे. चारपैकी तीन किंवा चारही नगरसेवक भाजपाचे असे ज्या प्रभागांमध्ये आहे तिथे काही अडचण नाही, मात्र तीन राष्ट्रवादीचे एक भाजपाचा अथवा तीन भाजपाचे एक शिवसेनेचा असे काही असेल त्या प्रभागांमध्ये नामकरणाच्या प्रस्तावांबाबत राजकीय अडचणी निर्माण होत आहेत. स्वपक्षाच्या नगरसेवकांकडून राजकीय दबाव, अन्य ज्येष्ठ नगरसेवकांकडून दबाव असे प्रकार होऊ लागले आहेत. त्यावर काय निर्णय करायचा हे नाव समितीत निश्चित होत नसल्याने तो निर्णय पक्षनेत्यांनीच घ्यावा असे सुचवत अडचणीतील प्रस्ताव त्यांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले आहेत.प्रभाग ३९ व ४१ मध्ये वादाची स्थितीप्रभाग क्रमांक ३९ मध्ये तीन नगरसेवक राष्ट्रवादीचे व एक भाजपाचा असे समीकरण आहे. तेथील एका उद्यानाला नाव देण्याबाबतभाजपाच्या एका सदस्याने त्यांच्या दिवंगत नेत्याचे नाव सुचवले आहे तर राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांनी एका राष्ट्रीय महिलेचे नाव द्यावे असा प्रस्ताव दिला आहे.याशिवाय प्रभाग क्रमांक ४१ मध्ये तीन भाजपाचे व एक शिवसेनेचा असे आहे. तिथे शिवसेनेच्या सदस्यांने मला ५ वर्षात कोणत्याच कामाला नाव देता येणार नाही का असा प्रश्न उपस्थित केला आहे. अशा प्रस्तावांचे काय करायचे याबाबत पक्षनेत्यांच्या बैठकीत निर्णय घ्यावा असे सुचवण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका