शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट सेट काढण्यासाठी वेळ हवा : नागराज मंजुळे; नितीन करमळकर यांनी दिले होते आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 12:14 IST

सावित्रीबाई फुले विद्यापीठात चित्रीकरणासाठी उभारलेला सेट मोठा नाही. तो काढण्यासाठीही बराच कालावधी लागेल, असे सांगत प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी विद्यापीठातून सेट हलवणार असल्याचे संकेत दिले.

ठळक मुद्देनागराज मंजुळे यांना दीड महिन्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते विद्यापीठातील मैदाननागराज मंजुळे पुढील दोन दिवसांमध्ये सेटसंदर्भात माध्यमांसमोर मांडणार भूमिका

पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठात चित्रीकरणासाठी उभारलेला सेट मोठा नाही. तो काढण्यासाठीही बराच कालावधी लागेल, असे सांगत प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी विद्यापीठातून सेट हलवणार असल्याचे संकेत दिले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर योग्य प्रक्रिया पार न पाडल्यामुळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेट लावण्यास परवानगी देण्यावर राज्य शासनाकडून गंभीर आक्षेप घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर, त्याला ७ दिवसांत सेट काढून घेण्याचे निर्देश कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिले होते. मात्र, त्याला १२ दिवस उलटून गेले तरी मैदानातील सेट हलविण्याबाबत कोणत्याही हालचाली सुरू करण्यात आलेल्या नाहीत. नागराज मंजुळे यांना विद्यापीठातील मैदान दीड महिन्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानुसार डिसेंबरपर्यंत त्यांनी मैदान रिकामे करणे अपेक्षित होते. मात्र, ४ महिने उलटले तरी अद्याप चित्रपटाचे शूटिंग सुरू झालेले नाही. विद्यापीठानेही नियमानुसार कुठलीही प्रक्रिया पार पाडली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विद्यापीठ प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून मैदान रिकामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ८ फेब्रुवारी रोजी कुलगुरूंनी तातडीने नागराज मंजुळे यांना नोटीसही बजावली. मात्र, तरीही दिलेल्या मुदतीत मैदानातून चित्रपटाचा सेट हलविण्यात आलेला नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नागराज मंजुळे यांनी उभारलेला शूटिंगचा सेट हटवण्याचे आदेश दिल्यानंतर मंगळवारी पहिल्यांदा मौन सोडले. पुढील दोन दिवसांमध्ये सेटसंदर्भात माध्यमांसमोर ते भूमिका मांडणार आहेत.

 

टॅग्स :Nagraj Manjuleनागराज मंजुळेPune universityपुणे विद्यापीठnitin karmalkarनितीन करमळकर