शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अनुभवांवर आधारित साहित्य मनाला भिडते -नागनाथ कोत्तापल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 03:44 IST

अनुभवांवर आधारित साहित्य मनाला भिडते. सर्वसाधारण लेखकाला लिखाणातून व्यक्त होताना काही धोकेही पत्करावे लागतात. तो धोके का पत्करतो, पत्करलेले धोके कसे हाताळतो, ते अनुभव कसे मांडतो हे सर्व घटक महत्त्वाचे ठरतात.

पुणे - अनुभवांवर आधारित साहित्य मनाला भिडते. सर्वसाधारण लेखकाला लिखाणातून व्यक्त होताना काही धोकेही पत्करावे लागतात. तो धोके का पत्करतो, पत्करलेले धोके कसे हाताळतो, ते अनुभव कसे मांडतो हे सर्व घटक महत्त्वाचे ठरतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांना दररोज नानाविध प्रकारची माणसे, वृत्ती, प्रवृत्ती भेटत असतात. त्यामुळे प्रशासकीय नोकरीच्या निमित्ताने अनुभवाचे एक मोठे दालनच त्यांच्यापुढे उभे ठाकलेले असते, असे मत माजी संमेलनाध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.रंगत-संगत प्रतिष्ठान आणि श्यामची आई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा काव्यप्रतिभा पुरस्कार उपजिल्हाधिकारी आणि शरद पवार यांचे स्वीय सहायक कवी सतीश राऊत यांना देण्यात आला. त्या वेळी कोत्तापल्ले बोलत होते. या वेळी रंगत-संगत प्रतिष्ठानचे अ‍ॅड. प्रमोद आडकर आणि श्यामची आई फाऊंडेशनचे भारत देसडला उपस्थित होते.कोत्तापल्ले म्हणाले, ‘मराठी साहित्यास जागतिक पातळीवर ओळख मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जाते. परंतु, मराठी साहित्यिकांचे अनुभवविश्व मर्यादित असल्याने ते वैश्विक अनुभवाशी नाळ जोडू शकत नाही. त्या तुलनेत कामाच्या स्वरूपामुळे प्रशासकीय अधिकाºयाचे अनुभवविश्व व्यापक असल्याने मराठी साहित्यात तो मोलाची भर टाकू शकतो.’अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.प्रशासनात असल्याने हाताळावे लागणारे शेतीचे तंटे, अनैतिक संबंधांमुळे निर्माण होणारे प्रश्न, जाती-पातीची भांडणे, दुष्काळ, छावण्या, निवडणुकीचे प्रसंग हेच माझ्या कवितेचे विषय होते. प्रेमकविता तुलनेने कमी लिहिल्या. माझ्या वरिष्ठ अधिकाºयांनी मला प्रोत्साहित केले. सरकारी अधिकाºयांमध्ये संवेदनशीलता नसते, हा समज काही अंशी खोडून काढण्यात यशस्वी झालो, याचे समाधान काव्यनिर्मितीमुळे मिळाले. - सतीश राऊत

टॅग्स :marathiमराठीnewsबातम्या