शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नगररचनाकार सहसंचालक नाझीरकरांसह तिघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 03:44 IST

अमरावती येथील नगररचनाकार सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यासह त्यांच्या पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा अखेर दाखल करण्यात आला आहे़ प्रथमवर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अमरावती येथील नगररचनाकार सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यासह त्यांच्या पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा अखेर दाखल करण्यात आला आहे़ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एऩ डी़ मेश्राम यांनी गेल्या महिन्यात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्यानंतर दत्तवाडी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे़ नगररचनाकार सहसंचालक हनुमंत जगन्नाथ नाझीरकर (वय ५३), त्यांची पत्नी संगीता हनुमंत नाझीरकर (वय ४२, दोघेही रा. स्वप्नशिल्प सोसायटी, कोथरूड) आणि नवनाथ आॅटोमोबाईल कंपनीचे भागीदार प्रवीण सोरटे (३०, रा. सिंहगड रोड, पर्वती) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़ याप्रकरणी नितीन साहेबराव पाटील (रा़ कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे़ पाटील यांची ओम साई आॅटोमोबाईल्स नावाची एजन्सी आहे़ यापूर्वी ते एका कंपनीत काम करीत होते़ त्यांना व्यवसाय सुरू करायचा असल्याने ते भागीदाराचा शोध घेत होते़ नाझीरकरांनी त्यांना आॅटोमोबाईल शोरूममध्ये भागीदारी करण्याची विनंती केली़ पत्नी संगीता नाझीरकर यांच्या नावावर आपण भागीदारी व्यवसाय करू, असे त्यांनी सांगितले़ त्यानंतर त्यांनी २०१२ मध्ये ओम साई आॅटोमोबाईल्स नावाची फर्म स्थापन केली़ सुरुवातीला व्यवसायातील प्रत्येक निर्णय ते दोघे मिळून घेत होते़ २०१५ पर्यंत ६ नवीन शोरूम सुरू केल्या़ मात्र, नाझीरकर यांच्याकडून आर्थिक बाबींमध्ये पारदर्शकता ठेवली जात नसल्याने त्यांच्यामध्ये सप्टेंबर २०१५ पासून वाद होऊ लागले़ मार्च २०१६ मध्ये त्यांच्यातील भागीदारी संपुष्टात आली़ एकूण ७ युनिटपैकी ४ युनिट संगीता नाझीरकर यांच्याकडे व ३ युनिट नितीन पाटील यांच्याकडे आल्या़ संगीता नाझीरकर यांनी त्यांचे पुतणे प्रवीण सोरटे यांच्याबरोबर भागीदारीत नवनाथ आॅटोमोबाईल नावाची नवीन फर्म स्थापन केली़ डिसेंबर २०१६ मध्ये ओमसाई आॅटोमोबाईल या पाटील यांच्या नावावरील फर्मच्या प्रमाणपत्राचे संगीता नाझीरकर यांनी नूतनीकरण करून एकूण १८० दुचाकी गाड्यांचे खोटे सेल लेटर बनवून आरटीओ यांच्याकडे जमा करून एप्रिल ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत त्या दुचाकी वाहनांची नोंदणी केली़ त्या दुचाकींची विक्री नवनाथ आॅटोमोबाईल या फर्मकडून झाली़ त्यामुळे या दुचाकी वाहनांचा विक्रीकर पाटील यांना भरावा लागला़ पाटील यांच्या गुडविलचा त्यांच्या परवानगी शिवाय वापर करून विश्वासघात केला व त्यांच्या फर्मच्या नावाचे बनावट सेल लेटर बनवून १८० गाड्यांची विक्री करून पाटील यांची आर्थिक फसवणूक केली़, असे या फिर्यादीत म्हटले आहे़