शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

पाणी वापरावर नाबार्डचे कृतिशील प्रबोधन - शिरसाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:49 IST

पाण्याची उपलब्धता ही आपल्यासमोरील मोठी समस्या आहे. पाण्याचा योग्य वापर आणि वाटप कसे होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. उसाचे क्षेत्र केवळ चार टक्के आहे. मात्र, ऊस एकूण शेतीच्या ७० टक्के पाणी पितो.

पाण्याची उपलब्धता ही आपल्यासमोरील मोठी समस्या आहे. पाण्याचा योग्य वापर आणि वाटप कसे होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. उसाचे क्षेत्र केवळ चार टक्के आहे. मात्र, ऊस एकूण शेतीच्या ७० टक्के पाणी पितो. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी नाबार्ड पुढाकार घेणार असून, त्यासाठी पतपुरवठादेखील करणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला असल्याची माहिती नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅण्ड रुरल डेव्हलपमेंटच्या (नाबार्ड) पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य महाव्यवस्थापक उदय शिरसाळकर यांनी नाबार्डच्या वर्धापन दिनाच्या (१२ जुलै) पार्श्वभूमीवर दिली.देशासह राज्यातील शेती ही संपूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे खरीप हंगामच शेती उत्पादनाचा मुख्य हंगाम आहे. रब्बीचा टक्का त्या तुलनेत फारच कमी आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धतता ही महाराष्ट्रापुढील सर्वांत मोठी समस्या आहे. शेतीखालील एकूण क्षेत्रापैकी फक्त १८ ते २० क्षेत्र सिंचनाखाली आहे. त्यातही ऊस व कापूस यासारख्या नगदी पिकांना लागणाºया पाण्याचे प्रमाण जास्त आहे.राज्याच्या एकूण कृषी क्षेत्रापैकी केवळ ४ टक्के क्षेत्रावर उसाचे पीक घेतले जाते. पण या पिकासाठी एकूण सिंचनासाठी वापरण्यात येणाºया पाण्याच्या ७० टक्के पाणी वापरले जाते. ही बाब महाराष्ट्रासारख्या अवर्षणग्रस्त राज्यासाठी चिंतेची आहे. असे असले तरी फारमोठा शेतकरीवर्ग या पिकावर अवलंबून आहे. त्यामुळे ऊसपीक घेऊ नको असा सल्ला कोणी देणार नाही. ठिबक, तुषार सिंचनाद्वारे पाण्याचा नियंत्रित वापर करूनही ऊसपीक घेता येते. त्याबाबत नाबार्ड अभियान राबवित आहे.राज्यात उसाचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र असलेल्या भागात जलदूतामार्फत जागृती अभियान राबविण्यात येत आहे. शासनाचे विविध विभाग, बँका, सहकारी संस्था, साखर कारखाने, स्वयंसेवी संस्था यांची देखील या कामी मदत घेतली जाणार आहे.मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांसह कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा आणि पुणे अशा विविध १० जिल्ह्यांतील ५ हजारांहून अधिक गावांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातील १० लाख हेक्टर क्षेत्र ठिबक आणि तुषार सिंचनाखाली आणण्याचा मानस आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने २०१९पर्यंत त्यातील साडेसात लाख हेक्टर ऊस क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या नुसार नियोजन करण्यात येणार आहे. या शिवाय राज्यातील प्रलंबित असणाºया जलसिंचन प्रकल्पांना तब्बल ७ हजार कोटी रुपयांचा पतपुरवठा करण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षांत ही रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाईल. त्यामुळे तब्बल साडेसात लाख हेक्टर सिंचनाखाली येईल.कृषी विभागासाठी दूध संकलन आणि प्रक्रिया उद्योग महत्त्वाची भूमिका बजावत असतो. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात दूधभुकटीचे भाव कोसळल्याने उद्योगावर संकटाची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या नाबार्डच्या माध्यमातून डेअरी उद्यम विकास योजना आणि कृषी व्यवसाय केंद्रासाठी पतपुरवठा केला जातो. तसेच त्याच्या प्रकल्प उभारणीसाठी अनुदानही मिळते. हा सर्व व्यवहार बँकांच्या माध्यमातून होतो. नाबार्ड बँकांकडून आलेल्या प्रस्तावाला मंजुरी देते. हा व्यवहार आॅनलाईन होतो. तसेच नुकतीच नॅशनल डेअरी डेव्हलपमेंटच्या माध्यमातून डेअरी इन्फ्रा ही योजना राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत सहकारी दूध संकलन करणाºया पेढ्यांना यंत्रसामग्री अद्ययावत करण्यासाठी पतपुरवठा करण्यात येणार आहे. संबंधित दूध संकलन केंद्रांना त्यासाठी डेअरी बोर्डाकडे अर्ज करावा लागेल.नाबार्ड ही स्वत:ची योजना राबवित नाही. सरकारने योजनानिहाय मंजूर केलेल्या निधीनुसार त्याचा पतपुरवठा केला जातो. तसेच सरकारकडून एखादी योजनासुरू अथवा बंद केली जाऊशकते. तसेच त्याचा निधीदेखील धोरणानुसार नियंत्रित केला जाऊ शकतो. त्यामध्ये नाबार्डची स्वत:ची भूमिका नसते. 

टॅग्स :Waterपाणीnewsबातम्या