शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

mutha Canal : जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:53 IST

शहराच्या मध्यवस्तीतून वाहणा-या मुठा कालव्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून, तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. परंतु यासाठी महापालिका प्रशासनाकडून वारंवार जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करूनदेखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला.

पुणे : शहरातील कालवाफुटीच्या दुर्घटनेची महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार पडसाद उमटले. शहराच्या मध्यवस्तीतून वाहणा-या मुठा कालव्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून, तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. परंतु यासाठी महापालिका प्रशासनाकडून वारंवार जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करूनदेखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाºयांवर कडक कारवाई करण्याची मागणी या वेळी केली.सिंहगड रोडवरील जनता वसाहतीमधून जाणारा मुठा उजवा कालवा सकाळी सव्वाआकरा वाजता फुटल्याने परिसरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती.या भागातील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचे संसार रस्त्यावर आले. या दुर्घटनेला जबाबदार नसल्याचे सांगत महापालिका तसेच जलसंपदा विभागाने आपले हात वर केले. या प्रकाराचे तीव्र पडसाद गुरुवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. या सर्व प्रकाराला पालिकेचा हलगर्जीपणा जबाबदार असून, कालव्याच्या भिंतीची अवस्था चांगली नाही, तातडीने त्याची दुरुस्ती करावी, असे पत्र स्थानिक नगरसेवकांनी प्रशासनास दिल्यानंतरही याची कोणतीही दखल अधिकाºयांनी घेतली नसल्याचा आरोप केला.खडकवासला ते पर्वती हे बंद पाइपलाइनचे काम करताना काही परिस्थिती निर्माण झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी पालिकेची राहील, असे जलसंपदा विभागाने कळवून देखील पालिकेतील अधिकाºयांनी याकडे सतत दुर्लक्ष केल्याचा आरोप सभासदांनी केला. याला जबाबदार असलेल्या अधिकाºयांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी केली.मुठा उजवा कालव्याला भगदाड पडल्याने निर्माण झालेल्या परिस्थिवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले प्रशासनाने उचलली आहेत. ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे, त्यांच्या राहण्याची तसेत खाण्याची व्यवस्था जवळच्या शाळेत केली आहे.या दुर्घटनेचा समावेश नैसर्गिक आपत्तीमध्ये करून येथील नागरिकांना अधिकाधिक मदत कशी मिळेल, यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीकडे प्रस्ताव पाठविले जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांनी सांगितले. अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी शहरातून जाणाºया कालव्यांचे आॅडिट करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.अनधिकृत केबल खोदाईची चौकशी कराज्या ठिकाणी हे भगदाड पडले आहे, तेथे काही कंपन्यांच्या केबल आहेत. त्यामुळे तेथील जमीन भुसभुशीत झाली आहे, या कंपन्यांना केबल टाकण्यासाठी कोणी परवानगी दिली, याची चौकशी करावी. शहरातील अनेक भागांमधील नागरिकांना अद्यापही पुरेसे पाणी मिळत नसताना कालव्याच्या माध्यमातून एवढे पाणी कोणतीही कल्पना न देता कसे सोडले जाते, याचीदेखील चौकशी झाली पाहिजे, असे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी सांगितले.कालवा समितीची बैठक अद्यापही झालेली नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात कालव्यातून पाणी कोणाच्या फायद्यासाठी सोडले जात होते, याची चौकशी झाली पाहिजे. पालिकेला कालव्याद्वारे ३०० क्युसेक्स पाणीपुरवठा केला जात असताना १३०० क्युसेक्स पाणी कोणाच्या आदेशाने सोडले जात होते.- अरविंद शिंदे, काँगे्रसचे गटनेतेप्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना...स्थानिक लोकप्रतिनिधींकडून वेळोवेळी मागणी करून देखील महापालिका प्रशासन आणि जलसंपदा खात्याकडून दर्लक्ष केले जाते. यामुळेच ही दुर्घटना झाली असून, ठेकेदाराने दिलेल्या मुदतीत काम न केल्यानेच कालवा फुटला. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.- श्रीनाथ भिमाले, महापालिका, सभागृह नेते

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या