शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Mutha Canal : पानशेत पुराच्या आठवणी जाग्या, यावेळी मात्र पाण्याने वेळच दिला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:14 IST

खडकवासला येथून येणारा मुठा कालव्याला भगदाड पडल्याने जनता वसाहतीतील अनेकांचे संसार पाण्यात गेले़ हे पाणी पाहून जुन्या जाणत्या अनेकांना पानशेत धरणफुटीच्या आठवणी ताज्या झाल्या.

पुणे  - नेहमीप्रमाणे सर्व सुरळीत सुरु असताना अचानक पाण्याचा लोंढा आला आणि सर्व काही धुवून नेले़ खडकवासला येथून येणारा मुठा कालव्याला भगदाड पडल्याने जनता वसाहतीतील अनेकांचे संसार पाण्यात गेले़ हे पाणी पाहून जुन्या जाणत्या अनेकांना पानशेत धरणफुटीच्या आठवणी ताज्या झाल्या़कालवा फुटल्याने रस्त्यावर झालेला जलप्रलय आणि घराघरात साचलेल्या पाण्याची दृश्य टीव्हीवरुन घरात बसलेल्या ज्येष्ठांनी पाहिले़ दांडेकर पूल वसाहतीतील अनेक ज्येष्ठांनी पानशेतचा प्रलय अनुभवलाही होता. संदीपान कांबळे यांनी सांगितले की, पानशेत धरण फुटणार याची थोडीशी कल्पना लोकांना अगोदर आली होती़ प्रत्यक्ष धरण फुटल्यानंतर काही तासांनी शहरात पाणी घुसले़ त्या वेळी पोलिसांनी गाड्यांवर भोंगे लावून लोकांना खबरदार करुन त्यांना घराबाहेर काढले होते़रेडीओवर घोषणा केली जात होती. अनेक सामाजिक कार्यकर्तेही लोकांना सुरक्षित स्थळी नेत होते. त्यावेळी अनेक जण तर धरणफुटीनंतर आलेले पाणी पाहण्यासाठी नदी काठावर आले होते़ या वेळी मात्र लोकांना वेळच मिळाला नाही.शशिकला रोहिदास खराटे यांनी सांगितले की, त्यावेळी आम्ही नवी पेठेत रहात होतो़ घरात माझ्या नंणद, भावजय, दीर असे ९ - १० लोक एकत्र राहात होतो़ लकडी पुलाच्या कमानीला पाणी लागले आणि सर्वत्र एकच कोलाहाल झाला़ पाणी आले पाणी आले़ जे अंगाने मजबूत होते़ ते हाताला येईल ती भांडी कुंडी गोळा करुन धावत उंच जागी जात होते़ आम्ही सर्वांनी हाताला येईल ते घेऊन धावत पळत पर्वतीच्या डोंगरावर गेलो़ तेथे किती वेळ होतो, याची काहीही शुद्ध नव्हती़ कधी एकदा पाणी उतरण्याची वाट पहात होतो़पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा घरात आलो तर तेथे सर्वत्र चिखल झाला होता़ इतरांचे सामान आमच्या घरात तर आमचे सामान दुसरीकडे वाहून गेले होते़ १९७१च्या दुष्काळानंतर जनता वसाहत व दांडेकर पुलाजवळची वस्ती वसली गेली आहे़ पानशेत धरण फुटले त्यावेळी पाणी तेथपर्यंत पोहोचले नव्हते. गुरुवारी फुटलेल्या कालव्याने जनता वसाहती व त्या परिसरातील लोकांना जराही वेळ दिला नाही़ जलप्रलयाने काही क्षणात होत्याचे नव्हते करुन टाकले़

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या