शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बारामती नगरपालिकेसमोर मुस्लिम समाजाचे चक्री उपोषण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 18:47 IST

एकाच कबरीमध्ये चार-पाच वेळा दफनविधी करावा लागतो. त्यामुळे मृतदेहाची विटंबना होते.

ठळक मुद्देअल्पसंख्यांक समाजाचा निधी : दुसरीकडे वापरल्याचा होतोय आरोप

बारामती : अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी आलेला निधी बारामती नगरपालिका दुसरीकडेच वापरत आहे, असा आरोप करीत बारामतीमधील मुस्लिम समाजाने बारामती नगरपालिकेच्या विरोधात सोमवार (दि. २) पासून नगरपालिकेच्या इमारतीसमोर बेमुदत चक्री उपोषण सुरू केले आहे. शहरात मुस्लिम समाजाची संख्या वाढत आहे. मात्र नगरपालिकेने अनेक वर्षांपासून मुस्लिम समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. नगरपालिका अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी असणारा निधी दुसरीकडेच वापरत आहे. याबाबत वारंवार संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला तरी देखील दखल घेतली जात नाही, तसेच मुस्लिम समाजाच्या मागण्यांकडे नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप मुस्लिम समाजाने केला आहे.मुस्लिम समाजासाठी शहरामध्ये दोन एकर जागा दफनभूमीसाठी द्यावी, बहुद्देशीय सभागृह बांधून द्यावे, शहरातील उर्द शाळेत १२ वी इयत्तेपर्यंत करावी व त्यासाठी इमारत बांधुन द्यावी, तसेच अल्पसंख्याक समाजासाठी मंजुर झालेला निधी फक्त त्याचा समाजासाठी वापरावा, बारामती शहरामध्ये वक्त बोर्डाच्या जागेतील अतिक्रमणे तातडीने काढावीत, अशा मागण्या मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांना देण्यात आले आहे. 

......................

एकाच कबरीमध्ये करावा लागतो चार-पाच वेळा दफन विधीशहरात मुस्लिम समाजाच्या जागेवरच दफनभूमी आहे. त्यावरच आतापर्यंत दफनविधी होत आले आहेत. ही जागा सध्या तोकडी पडत आहे. एकाच कबरीमध्ये चार-पाच वेळा दफनविधी कारावा लागतो. त्यामुळे मृतदेहाची विटंबना होते. नगरपालिकेने  दफनभूमीसाठी उपलब्ध करून दिलेली जागा खंडोबानगरमधील नदीपात्रामध्ये आहे. मात्र याठिकाणी अंत्यविधी कराताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शहरातील मुस्लिम सामाजाच्या लोकसंख्येचा विचार करून शहराच्या वाढीव हद्दीमध्ये कमीतकमी एक एकर जागा दफनभूमी करता उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. 

टॅग्स :BaramatiबारामतीMuslimमुस्लीम